शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लाखो सामान्य माणसांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गुगलने २५ जून २०२६ रोजी Android फोनसाठी एक नवीन ॲप आणले आहे, ज्याचे नाव आहे Google Finance App.
या ॲपमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेअर्सचे भाव का वर-खाली होतात याचे सोपे स्पष्टीकरण दिले जाते. याआधी हे सगळे समजण्यासाठी अनेक बातम्या वाचाव्या लागत होत्या. आता ते काम गुगलचे AI स्वतः करणार आहे.
एआय-पॉवर्ड रिसर्च टूलचा फायदा
गुगलचे हे AI-powered रिसर्च टूल युजर्सना त्यांच्या पोर्टफोलिओमधील वैविध्य, सेक्टर एक्स्पोजर (विशिष्ट क्षेत्रातील गुंतवणूक) आणि दीर्घकालीन वाढीच्या संभाव्यतेबद्दल (long-term growth potential) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.
“Key Moments” हे फीचर सगळ्यात महत्त्वाचे
या ॲपमधील सगळ्यात उपयुक्त गोष्ट म्हणजे “Key Moments” हे फीचर. एखाद्या कंपनीचे तिमाही निकाल आले, मोठी खरेदी-विक्री जाहीर झाली, किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत काही बदल घडला, तर त्यामुळे शेअरचा भाव का हलला याचे स्पष्टीकरण हे AI आपोआप देते. तुम्हाला स्वतः काही शोधायची गरज नाही.
AI-जनरेटेड मार्केट ब्रीफिंग्ज
गुगल याद्वारे AI-जनरेटेड मार्केट ब्रीफिंग्ज देखील सुरू करत आहे. गुंतवणूकदार याद्वारे त्यांच्या गरजेनुसार कस्टम टास्क तयार करू शकतात; जसे की प्रमुख शेअर्स किंवा क्रिप्टोकरन्सीच्या हालचालींवर दैनंदिन प्री-मार्केट अपडेट्स (बाजार सुरू होण्यापूर्वीची माहिती) मिळवणे. ही सेवा गुगल ॲप आणि गुगल फायनान्स वेब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्सना त्यांच्या आवडीनुसार अचूक माहिती पुरवेल.
एकाच डॅशबोर्डवर मिळणार ‘पोर्टफोलिओ फिचर्स’
आजपर्यंत कोणाची गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असते. कुठे म्युच्युअल फंड, कुठे शेअर्स, कुठे दुसरे काही. या नव्या ॲपमध्ये सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी एकत्र पाहता येते. त्यासाठी फाईल अपलोड करता येते किंवा साध्या भाषेत सांगता येते की माझ्याकडे कोणते शेअर्स आहेत.
आधीपासून Google Finance वापरत असाल तर तुमचा जुना डेटा आपोआप नव्या ॲपमध्ये दिसेल. नवीन असाल तर CSV किंवा PDF फाईल टाकून सुरुवात करता येते. गुंतवणुकीचे फोटो देखील टाकता येतात. एकदा गुंतवणूक टाकली की AI ला प्रश्न विचारता येतात.
उदाहरणार्थ, माझ्या गुंतवणुकीत कोणत्या क्षेत्राला कमी जागा दिली आहे, किंवा दीर्घकाळासाठी हे किती योग्य आहे, असे प्रश्न विचारता येतात आणि AI उत्तर देतो.
दररोज ठरवलेल्या वेळी बाजाराची माहिती मिळणार
या ॲपमध्ये तुम्ही स्वतःसाठी एक वेळापत्रक तयार करू शकता. उदाहरणार्थ, दररोज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी प्रमुख शेअर्समध्ये काय बदल झाले याची माहिती मिळावी असे सांगता येते. ही माहिती तयार झाली की मोबाईलवर अलर्ट येतो.
iPhone वापरणाऱ्यांसाठी कधी येणार?
सध्या हे ॲप फक्त Android फोनसाठी उपलब्ध आहे. iPhone साठी हे ॲप २०२६ च्या शेवटी येणार असल्याचे गुगलने सांगितले आहे. पुढच्या काही महिन्यांत थेट कंपन्यांचे निकाल ऐकण्याची सोय देखील ॲपमध्ये येणार आहे.
हे ॲप Google Play Store वर मोफत मिळते आणि त्यातील सगळी फीचर्स विनामूल्य वापरता येतात. Zerodha, Groww सारख्या ॲपवरून प्रत्यक्ष खरेदी-विक्री करायची असेल तर ती तिथेच करावी लागेल.
एक महत्त्वाची गोष्ट
गुगलने स्वतःच सांगितले आहे की AI चुका करू शकतो. त्यामुळे मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. हे ॲप फक्त माहिती देण्यासाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला देण्यासाठी नाही, शेवटी निर्णय तुमचाच असतो. Google Finance हे trading साठी नाही.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Google Finance App मोफत आहे का?
होय, हे ॲप Google Play Store वर मोफत मिळते. आतील सगळी फीचर्स वापरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
Key Moments म्हणजे काय?
Key Moments हे AI फीचर आहे जे शेअरच्या भावात मोठा बदल झाला तेव्हा त्यामागील कारण सोप्या भाषेत सांगते. त्यासाठी वेगळ्या बातम्या शोधायची गरज नाही.
माझा जुना डेटा नव्या ॲपमध्ये दिसेल का?
होय, आधीपासून Google Finance वापरत असाल तर जुना डेटा आपोआप दिसेल. नवीन असाल तर फाईल टाकून किंवा AI ला सांगून सुरुवात करता येते.
या ॲपवरून शेअर्स विकत घेता येतात का?
नाही, हे ॲप फक्त माहिती आणि विश्लेषणासाठी आहे. प्रत्यक्ष खरेदी-विक्री तुमच्या ब्रोकरच्या ॲपवरूनच करावी लागेल.