Voter Card Mobile Number Link “मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करा! घरबसल्या 5 मिनिटात नंबर अपडेट करण्याची सोपी ऑनलाइन प्रक्रिया

Voter Card Mobile Number Link: मतदार यादीत नाव आहे, कार्डही घरात आहे, पण e-EPIC डाउनलोड करायला गेलो की OTP येतच नाही. असा अनुभव अनेकांना येतो. कारण एकच असतं: Voter ID ला आपला सध्याचा मोबाईल नंबर जोडलेलाच नसतो. वीस वर्षांपूर्वी काढलेलं कार्ड असेल, किंवा कार्ड काढताना कुणाचा तरी जुना नंबर दिला गेला असेल, तर हा घोळ होतोच.

या लेखात आपण पाहू की Voter Card ला मोबाईल नंबर कसा जोडायचा, कोणती पद्धत सोपी आहे आणि अडचण आली तर काय करायचं.

मोबाईल नंबर लिंक असणं का महत्त्वाचं आहे?

Voter ID सोबत नोंदवलेला मोबाईल नंबर e-EPIC (डिजिटल Voter ID) डाउनलोडसाठी लागणाऱ्या OTP साठी, पोर्टलवर लॉगिनसाठी आणि Form 8 द्वारे नाव, पत्ता, फोटो यांसारख्या दुरुस्त्यांसाठी वापरला जातो. हा नंबर नसेल तर बहुतांश ऑनलाइन सेवा वापरता येत नाहीत.

e-EPIC चा फायदा वेगळा सांगायला नको. मोबाईलमध्ये किंवा DigiLocker मध्ये ठेवता येतो, हवा तेव्हा प्रिंट काढता येतो. आज बँकेत नवीन bank account उघडताना, SIM घेताना, personal loan किंवा credit card साठी अर्ज करताना KYC मध्ये identity proof आणि address proof लागतो.

Voter ID हा त्यासाठी सर्वमान्य पुरावा आहे. कार्ड हरवलं तर काही मिनिटांत डिजिटल प्रत हातात असणं हे मोठं सोयीचं आहे, पण त्यासाठी नंबर जोडलेला हवा.

आधी तपासा, नंबर आधीच जोडलेला आहे का?

फॉर्म भरण्याआधी हे पाहून घ्या, कारण कधी कधी नंबर आधीच असतो आणि तो जुना असतो.

electoralsearch.eci.gov.in वर जा आणि “Search by Mobile” पर्याय निवडा. ज्यांचा मोबाईल नंबर मतदार यादीत नोंदलेला आहे, त्यांना या पर्यायाने शोध घेता येतो. तुमचा नंबर टाकल्यावर तुमची माहिती दिसली तर नंबर आधीच जोडलेला आहे. काही दिसलं नाही तर तो जोडावा लागेल.

एक महत्त्वाची गोष्ट: एका Voter ID ला एका वेळी एकच active मोबाईल नंबर जोडता येतो.

Voter Card Mobile Number Link करण्याची ऑनलाइन पद्धत

Voters’ Service Portal वरूनही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मोबाईलवरही काही मिनिटांत पूर्ण करता येते. तुमचा जुना नंबर बंद असला तरीही ही प्रक्रिया ऑनलाइन करता येते.

  1. voters.eci.gov.in हे अधिकृत पोर्टल उघडा. कोणत्याही खासगी साइटवर जाऊ नका.
  2. Login/Sign-Up करा: जर खातं नसेल तर “Sign-Up” वर क्लिक करून तुमच्या सध्या चालू असलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरने नवीन खातं तयार करा. जुना नंबर चालू असण्याची अजिबात गरज नसते. चालू नंबरवर आलेला OTP टाकून पासवर्ड सेट करा आणि लॉगिन करा.
  3. लॉगिन झाल्यावर मुख्य पानावर असलेल्या Form 8 वर क्लिक करा.
  4. तिथे “Self” किंवा “Other Elector” पैकी योग्य पर्याय निवडून तुमचा EPIC नंबर टाका.
  5. पुढे “Correction of Entries in Existing Electoral Roll” हा दुसरा पर्याय निवडा आणि Ok वर क्लिक करा.
  6. आता खाली स्क्रोल करून “Mobile Number” या पर्यायापुढील बॉक्सवर टिकमार्क (Check) करा. यामुळे नवीन नंबर टाकण्याचा रकाना उघडेल.
  7. तुमचा नवीन चालू १० अंकी मोबाईल नंबर टाका आणि “Send OTP” वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून तो verify करा.
  8. सर्व माहिती तपासून Declaration पूर्ण करा आणि Captcha टाकून अर्ज Submit करा. सबमिट झाल्यावर मिळणारा Reference ID सुरक्षित ठेवा, त्यावरून तुम्हाला अर्जाची स्थिती (Application Status) तपासता येईल

Voter Helpline App वरूनहेच काम Voter Helpline App मधूनही करता येतं. Play Store किंवा App Store वरून Election Commission of India चं अधिकृत app डाउनलोड करा. नावासारखी दिसणारी बरीच बनावट apps असतात, त्यामुळे अधिकृत ॲपच वापरा. ॲपमध्ये लॉगिन करून “Voter Services” मधील Form 8 निवडून वरीलप्रमाणेच नवीन नंबर लिंक करता येतो.

Voter Card Mobile Number Link करण्याची ऑफलाइन पद्धत

जर ऑनलाइन अर्ज करण्यात काही तांत्रिक अडचण येत असेल, तर ऑफलाइन मार्गही उपलब्ध आहे.

तुमच्या भागाचा BLO (Booth Level Officer) किंवा तहसील/मतदार नोंदणी कार्यालय (ERO) गाठा. BLO किंवा ERO मतदार यादीत तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतात. तुमच्या BLO चं नाव आणि फोन नंबर पोर्टलवरच “Know Your BLO” मध्ये EPIC नंबर किंवा पत्ता टाकून मिळतो. मदतीसाठी १९५० या टोल-फ्री हेल्पलाइनवर कॉल करता येतो.

तिथे जाताना सोबत ठेवा:* Voter ID ची प्रत (EPIC नंबर)* ओळखीचा कोणताही पुरावा* चालू मोबाईल, कारण पडताळणीसाठी OTP त्यावरच येईल

मोबाईल लिंक आणि आधार लिंक: दोन वेगळ्या गोष्टी

इथे सगळ्यात जास्त गोंधळ होतो. Voter ID ला मोबाईल नंबर जोडणे आणि Voter ID ला इतर ओळखपत्र जोडणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. ओळख तपशील जोडण्यासाठी Form 6B वापरला जातो, तर मोबाईल नंबर जोडण्यासाठी Form 8 वापरला जातो.

तसेच ओळखपत्र जोडणं बंधनकारक नसून ते ऐच्छिक आहे. कुणी “लिंक केलं नाही तर मतदार यादीतून नाव कमी होईल किंवा मतदान करता येणार नाही” असं सांगत असेल तर ते खरं नाही.

येणाऱ्या अडचणी आणि उपाय

  • OTP येत नाही: मोबाईल नेटवर्क तपासा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. फॉर्म भरताना तुम्ही जो नवीन नंबर टाकला आहे, त्यावरच OTP येतो.
  • अर्ज रखडला: कधी BLO verification pending दिसतं. अशा वेळी तुमच्या भागातील BLO शी संपर्क साधा किंवा १९५० वर कॉल करून तुमच्या अर्जाचा Reference ID सांगा.
  • फसवणुकीपासून सावध राहा: Voter ID ला मोबाईल नंबर लिंक करून देतो असं सांगणारे अनेक बनावट एजंट आणि लिंक्स फिरत असतात.

हे लक्षात ठेवा:

  • ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी निवडणूक आयोग कोणतेही शुल्क घेत नाही.
  • अर्ज फक्त voters.eci.gov.in किंवा अधिकृत Voter Helpline App वरूनच करा.
  • तुमचा OTP कुणालाही सांगू नका, फोनवर किंवा मेसेजवर सुद्धा नाही.
  • “तुमचं Voter ID बंद होणार आहे, ही लिंक उघडा” अशा कोणत्याही मेसेजवर किंवा अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नका.

शेवटी

Voter Card ला मोबाईल नंबर जोडणं हे अवघ्या पाच मिनिटांचं काम आहे, पण ते न केल्यामुळे पुढे डिजिटल कार्ड मिळवताना धावपळ होते. आत्ताच तुमचा नंबर नोंदलेला आहे का ते तपासा, नसेल तर आजच अपडेट करा. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या Voter ID वरही नंबर जोडलेला आहे का, याची खात्री नक्की करा.

Leave a Comment