50000 Loan without Cibil Score: अचानक पैशांची गरज पडते. हॉस्पिटलचे बिल, मुलाची फी किंवा घरातली एखादी तातडीची गोष्ट. तुम्ही कधी कर्ज घेतलेले नाही, क्रेडिट कार्डही वापरलेले नाही, आणि बँकेने सिबिल स्कोअर विचारला की तुमच्याकडे उत्तरच नाही. मग ₹50,000 चे कर्ज मिळेल का?
मिळू शकते, पण थोडी मेहनत लागते आणि कोणतीही हमी नाही. आधी एक गोष्ट नीट समजून घ्या, कारण इथेच बहुतेक लोक गोंधळतात.
सिबिल स्कोअर नसणे आणि स्कोअर खराब असणे, यात काय फरक आहे?
स्कोअर खराब असणे म्हणजे तुम्ही आधी कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते चुकवले आहेत. स्कोअर नसणे म्हणजे तुमच्या नावावर कर्जाचा किंवा क्रेडिट कार्डचा कोणताच व्यवहार नोंदलेला नाही. बँकेच्या भाषेत अशा व्यक्तीला NTC म्हणतात, म्हणजे New to Credit. तुम्ही वाईट कर्जदार नाही, फक्त बँकेकडे तुमचा रेकॉर्ड नाही.
NTC अर्जदाराला कर्ज द्यायचे की नाही, हे बँक आणि NBFC इतर गोष्टी बघून ठरवतात. पगार किती आणि कुठून येतो, बँक खात्यात किती वर्षांपासून आणि कसे व्यवहार आहेत, नोकरी किंवा धंदा किती स्थिर आहे, हे सगळे तपासले जाते. सिबिल नाही म्हणून नकार मिळेलच असे नाही. पण सिबिल नाही म्हणून मंजुरी सहज मिळेल असेही नाही.₹
50000 Loan without Cibil Score साठी 6 पर्याय
1. तुमच्या स्वतःच्या बँकेत चौकशी
सगळ्यात आधी इथे जा. तुमचा पगार किंवा धंद्याचे पैसे वर्षानुवर्षे त्याच खात्यात येत असतील, तर बँकेला तुमचे व्यवहार आधीपासून दिसत असतात. अनेकदा अशा ग्राहकांना बँक pre-approved ऑफर देते. बँकेच्या app मध्ये लॉगिन करून loan सेक्शन बघा, तिथे तुमच्यासाठी काही ऑफर आहे का ते कळेल.
2. NBFC कडून Personal Loan
काही NBFC नवीन क्रेडिटवाल्या लोकांनाही कर्ज देतात, आणि आधार-PAN वर eKYC करून काही तासांत प्रक्रिया पूर्ण होते. पण सगळ्या NBFC असे करत नाहीत. अर्ज करण्याआधी कंपनी RBI कडे नोंदणीकृत आहे का, ते RBI च्या वेबसाइटवर तपासा. व्याजदर आणि प्रोसेसिंग फी अर्ज भरण्याआधीच बघा.
3. Gold Loan
घरात सोने असेल तर हा सगळ्यात सोपा मार्ग. इथे बँक तुमच्या स्कोअरपेक्षा सोन्याची किंमत बघते, त्यामुळे NTC असण्याचा फारसा अडथळा येत नाही. मंजुरीही लवकर होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हप्ते चुकले तर सोने लिलावात जाऊ शकते.
4. FD वर कर्ज
तुमच्या नावावर FD असेल तर ती मोडू नका, तिच्यावर कर्ज घ्या. साधारणपणे व्याज FD च्या दरापेक्षा थोडे जास्त असते, पण नेहमीच्या Personal Loan पेक्षा खूप कमी पडते. FD सुरूच राहते आणि त्यावरचे व्याजही मिळत राहते.
5. Salary Advance किंवा कंपनीकडून मदत
नोकरी करत असाल तर HR कडे विचारा. बऱ्याच कंपन्या पगाराच्या आधारावर advance देतात, तर काही ठिकाणी employee loan ची सोय असते. यात क्रेडिट चेकचा प्रश्नच येत नाही.
6. Credit Card किंवा BNPL
हा पर्याय अनेकांना सुचत नाही. तुम्हाला खरेदी किंवा बिल भरण्यासाठीच पैसे हवे असतील, तर रोख कर्जाऐवजी Buy Now Pay Later किंवा FD वर मिळणारे secured credit card वापरता येते. पण वेळेत पैसे भरले नाहीत तर यावरचे व्याज आणि दंड खूप जास्त असतो. म्हणून हा पर्याय तेव्हाच निवडा जेव्हा पैसे वेळेत भरण्याची खात्री असेल.
50000 Loan without Cibil Score साठी कागदपत्रे
कर्जाच्या प्रकारानुसार यादी बदलते, पण साधारणपणे हे लागते:-
- आधार कार्ड आणि PAN कार्ड
- गेल्या 3 ते 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- पगाराची स्लिप किंवा उत्पन्नाचा पुरावा (धंदा असेल तर ITR किंवा GST चे कागद)
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो
फक्त आधार कार्ड दाखवून कर्ज मिळते, असे जाहिरातीत दिसले तर थांबा. कोणताही खरा कर्जदाता उत्पन्न तपासल्याशिवाय पैसे देत नाही.
₹50,50000 Loan without Cibil Score चा EMI किती पडतो?
कर्ज घेण्याआधी हप्ता किती असेल ते स्वतः हिशोब करून बघा. खालच्या टेबलमध्ये ₹50,000 साठी तीन वेगवेगळ्या व्याजदरांवरचा अंदाजे मासिक EMI दिला आहे.
| व्याजदर (वार्षिक) |
6 महिने | 12 महिने | 24 महिने |
|---|---|---|---|
| 12% | ₹8,627 | ₹4,442 | ₹2,354 |
| 18% | ₹8,777 | ₹4,584 | ₹2,496 |
| 24% | ₹8,926 | ₹4,728 | ₹2,644 |
टीप: प्रत्यक्ष EMI कर्जाची रक्कम, प्रक्रिया शुल्क आणि कर्जाच्या अटींनुसार बदलू शकते.
आकडे अंदाजे आहेत. सिबिलशिवाय किंवा NTC ला मिळणाऱ्या कर्जावर व्याज साधारणपणे वरच्या बाजूला असते, म्हणून 18% आणि 24% ची ओळ जास्त लक्षात ठेवा.
आता प्रोसेसिंग फी धरून खरा खर्च बघा. समजा तुम्ही 18% दराने 12 महिन्यांसाठी ₹50,000 घेतले आणि 2% प्रोसेसिंग फी लागली. फी ₹1,000 आणि त्यावर 18% GST म्हणजे ₹180, एकूण ₹1,180. 12 महिन्यांत तुम्ही एकूण ₹55,008 परत करता, त्यात फीचे ₹1,180 मिळवले की तुमचे ₹50,000 चे कर्ज तुम्हाला सुमारे ₹56,188 ला पडते. म्हणजे ₹6,000 पेक्षा जास्त पैसे फक्त कर्जाच्या खर्चात गेले.
कालावधी वाढवला की हप्ता कमी दिसतो, पण व्याज जास्त जाते. 24 महिन्यांत त्याच 18% वर तुम्ही ₹59,904 भरता. ही रक्कम बघून मगच कालावधी ठरवा.
सिबिल स्कोअर कसा तयार करायचा?
आज कर्ज मिळाले तरी भविष्यासाठी स्कोअर तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे करता येते:-
- FD वर secured credit card घ्या – यात मर्यादा तुमच्या FD इतकी असते आणि मंजुरी जवळपास निश्चित असते.
- कार्डवर छोटे खर्च करा – उदाहरणार्थ मोबाईल रिचार्ज किंवा किराणा, आणि बिल पूर्ण भरा.
- छोटे कर्ज घेतले तर एकही हप्ता चुकवू नका.
- 3 ते 6 महिन्यांनी तुमचा स्कोअर तयार होऊ लागतो.
स्कोअर तपासायचा असेल तर RBI च्या नियमानुसार प्रत्येक क्रेडिट ब्युरोकडून वर्षातून एकदा पूर्ण रिपोर्ट मोफत मिळतो. त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही.
Online Loan App निवडताना हे नक्की तपासा
ऑनलाइन कर्जात सगळ्यात जास्त फसवणूक होते, म्हणून या गोष्टी बघूनच पुढे जा.
- कर्ज देणारी संस्था कोण आहे, ते स्पष्ट दिसते का? App चे नाव नको, बँक किंवा NBFC चे नाव आणि RBI नोंदणी बघा.
- कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते का? कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या किंवा वैयक्तिक खात्यात पैसे पाठवू नका.
- मंजुरीच्या आधी पैसे मागितले तर तिथेच थांबा. खऱ्या कर्जदात्याचे शुल्क कर्जातून कापले जाते, आधी भरायला सांगितले जात नाही.
- अर्ज करताना कर्जदात्याने एक छोटे पत्रक (Key Fact Statement) द्यायला हवे, ज्यात व्याजदर, एकूण खर्च आणि सगळे शुल्क लिहिलेले असते. ते वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका.
- App तुमचे संपर्क, गॅलरी किंवा फोटो मागत असेल तर ते देऊ नका. कर्जासाठी याची गरज नसते.
OTP, UPI PIN किंवा बँकेचा पासवर्ड कोणालाही सांगू नका, मग तो बँकेचा माणूस आहे असे सांगणारा असला तरी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. सिबिल स्कोअर नसताना ₹50,000 चे कर्ज मिळते का?
होय, मिळू शकते. काही बँका आणि NBFC उत्पन्न, बँक खात्याचे व्यवहार आणि नोकरीची स्थिरता बघून निर्णय घेतात. पण मंजुरी प्रत्येक कर्जदात्याच्या अटींवर अवलंबून असते.
2. फक्त आधार कार्डवर कर्ज मिळते का?
नाही. आधार ओळखीसाठी लागते, पण कर्जदाता PAN आणि उत्पन्नाचा पुरावाही मागतो.
3. सिबिल स्कोअर कमी असेल तर काय?
कमी स्कोअर असलेल्यांना कर्ज मिळू शकते, पण व्याज जास्त लागते आणि मंजुरी कठीण असते. स्कोअर नसणे हा वेगळा विषय आहे, त्यावर वर सविस्तर लिहिले आहे.
4. कर्ज मंजूर झाल्यावर प्रोसेसिंग फी लागते का?
बहुतेक कर्जांवर लागते. साधारणपणे कर्जाच्या रकमेच्या 1 ते 3% आणि त्यावर GST. अर्ज करण्याआधी फी किती आहे ते विचारा.
5. सिबिल स्कोअर किती दिवसांत तयार होतो?
पहिल्यांदा क्रेडिट वापरल्यानंतर साधारण 3 ते 6 महिन्यांनी स्कोअर दिसू लागतो.
शेवटी काय करायचे?
सुरुवात तुमच्या स्वतःच्या बँकेपासून करा. सोने किंवा FD असेल तर त्यावरचे कर्ज सगळ्यात स्वस्त आणि सोपे पडते. कुठेही अर्ज करण्याआधी EMI, प्रोसेसिंग फी आणि एकूण परतफेड हिशोब करून बघा, आणि अनोळखी app वर वैयक्तिक माहिती देणे टाळा.
सूचना: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. यात दिलेले व्याजदर आणि EMI उदाहरणादाखल आहेत, कर्ज मंजुरीची हमी किंवा वैयक्तिक आर्थिक सल्ला नाही. अर्ज करण्याआधी संबंधित कर्जदात्याच्या अधिकृत अटी वाचा.