Well Subsidy Scheme 2024: शेतकरी मित्रांनो! आता शेतात विहीर बांधा ते सुद्धा एकही रुपया खर्च न करता! जाणून घ्या कसं?

Well Subsidy Scheme: मित्रांनो जसे की आपण सर्वच जाणतो की पाणी हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य असणारा एक घटक आहे आणि त्याशिवाय शेतीची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच, शेतकरी अलीकडे शेतीसाठी किंवा शेताच्या सिंचनासाठी कायमचे आणि शाश्वत पाण्याचे स्त्रोत प्रदान करण्यासाठी म्हणून बोअरवेल आणि शेततळे यांसारख्या साधनाचा वापर करत आहेत. शेतीच्या सिंचनावर मर्यादा येऊ नये तसेच पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून याठिकाणी विहिरी किंवा बोअरवेलचे महत्त्व खूप जास्त आहे. जेव्हा शेतीसाठी पाणी नसते किंवा कोरडवाहू क्षेत्र असते तेव्हा या भागात पाणी उपलब्ध नसल्यामुळे पिकांची उत्पादकता कमी होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

Well Subsidy Scheme 2024
Well Subsidy Scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यानुसार कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच ह. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता नवीन विहिरी बांधण्यासाठी चांगले अनुदान मिळत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या गावांमधील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेतीसाठी संरक्षित पाण्याची सुविधा निर्माण करून पीक उत्पादन वाढवणे हा आहे.

Well Subsidy Scheme Terms and Conditions

  • ग्राम कृषी संजीवनी समितीने मंजूर केल्या असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (Well Subsidy Scheme) माध्यमातून निवड केलेल्या गावांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती/जमातीचे शेतकरी तसेच महिला, अपंग व इतर शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत या विहीर वापरण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ 0.40 हेक्टरपेक्षा जास्त असण्याची आवश्यकता असणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे कृषी सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा (Well Subsidy Scheme) लाभ घेता येणार असून यापूर्वी या योजनेचा लाभ ज्या कोणत्या शेतकऱ्यांनी घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गतची लाभार्थी निवडताना असलेली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ही की पाचशे मीटरपेक्षा जास्त अंतर हे विहीर आणि सार्वत्रिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यांच्यामधे नसले पाहिजे.
  • या शिवाय, महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 नुसार, या योजनेंतर्गत घेण्यात येणारी विहीर आणि इतर पूर्वीच्या विहिरींमधील असलेले अंतर हे 150 मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • तसेच, विहिरींचे ठिकाण निश्चित करण्यासाठी लाभार्थ्यांजवळ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून, ग्राम कृषी संजीवनी समितीने मंजूर केलेले, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक असणारं आहे.
  • या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त 1 वर्षाचा कालावधी हा नवीन विहीर खोदण्यासाठी आणि इतर कामे पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला आहे.

नवीन विहीर कार्यक्रमांतर्गत किती अनुदान दिले जाईल? | How much Well Subsidy Scheme will be given?

नवीन विहिरींचे बांधकाम या घटकांतर्गत नवीन विहिरी बांधण्यासाठी 100% अनुदान दिले जाईल, जे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विहिरीचे खोदकाम आणि उत्खनन पूर्ण झाल्यानंतर उत्खननाचा आणि खोदकामाचा येणार एकूण खर्च अंदाजपत्रकात नोंदणी केल्यानुसार देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात खोदकाम व विहीर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंदाजपत्रकानुसार खर्च देण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की 100% अनुदान, म्हणजेच 2.5 लाख रुपयाचे अनुदान हे, थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

अर्ज कुठे करायचा? | Where to apply for Well Subsidy Scheme

या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत या विहीर सबसिडी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत वेबसाइट, म्हणजेच https://dbt.mahapocra.gov.in ya वेबसाईट वर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करणे आवश्यक असणारं आहे.

आवश्यक कागदपत्र व अटी
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
  • या योजनेंतर्गत लघु व मध्यमवर्गीय शेतकरी पात्र ठरतील.
  • आधार कार्ड
  • पत्ता पुरावा
  • ओळखपत्र
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

मित्रांनो या ठिकाणी कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नोंदणी करून अर्ज करताना तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहेत. तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला सबसिडी बद्दल कळवण्यात येईल.

Leave a Comment