PM Kisan Mandhan Yojana: आता शेतकऱ्यांनाही दरमहा मिळणार 3,000 रुपयांची पेंशन!

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आजपर्यंत केंद्र सरकार द्वारे अनेक योजना राबवण्यात येत आहे, आणि आता त्यापैकीच अजून एक योजना म्हणजे ‘किसान मानधन योजना’ (PM Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत आर्थिक मदत ही वयाची ६० वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना मिळू शकते. सामान्यत: बघायला गेलं तर म्हातारपणी किंवा उतरत्या वयात शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, आणि अशा वेळी त्यांना आर्थिक मदतीसाठी सतत दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. मात्र आता ही बाब लक्षात घेऊन ‘किसान मानधन योजना’ केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे.

PM Kisan Mandhan Yojana
PM Kisan Mandhan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक ना अनेक योजना राबवतच असते. सरकार शेतकऱ्यांना या योजनांच्या मदतीने अनेक प्रकारचे फायदे देत आहे. आता या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजना, या योजनेचा देखील (PM Kisan Mandhan Yojana) समावेश केला गेला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन केंद्र सरकार या योजनेंतर्गत देणार आहे. या योजनेसाठी अर्ज करून शेतकरी या योजनेद्वारे वयाच्या ६० वर्षांनंतर वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकणार आहेत.

या योजने दरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्या शेतकऱ्याची पत्नी या कौटुंबिक पेन्शनच्या ५० टक्के रक्कम मिळण्यास पात्र असेल. या योजनेंतर्गत कुटुंबासाठीची पेन्शन ही फक्त शेतकरी आणि त्याच्या पत्नीलाच मिळते. शेतकरी आपल्या वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) त्यांना त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर आर्थिक बळ प्रदान करते. आता आपण आमच्याव्या लेखाद्वारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण आणि अर्ज कसा करू शकतो ते जाणून घेऊया.

१२ सप्टेंबर, २०१९ रोजी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) सुरू करण्यात आली होती, आणि या योजनेचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा होता. शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची तरतूद PM Kisan Mandhan Yojana अंतर्गत केली गेली आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याचा जर कोणत्याही कारणाने मृत्यू झाला असल्यास तर त्याच्या पत्नीला दरमहा १५०० रुपये देण्याचीही तरतूद आहे.

प्रीमियम प्रति महिना ५५ रुपये

१८ ते ४० वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची नोंदणी करण्यास पात्र असतील. शेतकरी कोणत्याही वयात या योजनेचा भाग बनत असेल तरी देखील त्यांना प्रत्येक महिन्याला ५५ ते २०० रुपये जमा करावेच लागतील. यानंतर, त्यांनी आपल्या वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतर, त्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला ३००० रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. या पेन्शन च्या आधारे हे शेतकरी आपल्या आर्थिक गरजा भागवू शकतात.

पैसे पीएम किसानच्या हप्त्यातूनच कापले जातील

सरकार दर वर्षी गरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये ६००० रुपयांची आर्थिक मदत पीएम किसान योजने अंतर्गत करते. मात्र त्याच वेळी, जर पीएम किसान योजनेचे खातेदार या पेन्शन योजनेत सहभागी झाले तर पीएम किसान मानधन योजनेसाठी ते सहज नाव नोंदवू शकतात. दुसरे म्हणजे, जर तुम्हाला हवे असेल तर पेन्शन योजनेसाठी दर महिन्याला कापले जाणारे पैसे देखील तुम्ही या 3 हप्त्यांमध्ये मिळालेल्या रकमेतून देऊ शकता. PM Kisan Mandhan Yojana

फायदा कसा आणि किती वाढेल

किमान ५५ रुपये आणि जास्तीत जास्त २०० रुपये दरमहा या पेन्शन योजनेत योगदान द्यावे लागेल. या संदर्भात, कमाल योगदान रुपये २४०० आणि किमान योगदान रुपये ६६० होते. या ६ हजार रुपयांमधून जास्तीत जास्त २४०० रुपये जरी वजा केले तरी ३६०० रुपये सन्मान निधी खात्यात शिल्लक राहतील. त्याच वेळी, तुम्हाला प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये पेन्शनचा लाभ तुम्ही ६० वर्षांचे झाल्यानंतर मिळणार आहे. सोबतच, २००० रुपयांचे ३ हप्ते देखील येतच राहतील. म्हणजे वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला एकूण ४२००० रुपयांचा वार्षिक लाभ होईल.

छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सध्याच्या परिस्थितीत जिथे देशातील अन्नदाताच स्वतः आर्थिक संकटामुळे मृत्यूला कवटाळून घेत असताना ही योजना शेतकरी बांधवांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी आहे. २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच ‘किसान मानधन’ योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकरी सुद्धा सहजच घेऊ शकतात.

PM Kisan Mandhan Yojana साठी अर्ज कसा करायचा

शेतकऱ्याकडे या PM Kisan Mandhan योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेताचे खसरा, खतौनी आणि बँक खाते पासबुक असणे आवश्यक असणारं आहे.

शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी ‘PM Kisan Mandhan Yojana‘ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला होम पेजवर लॉगिन करावे लागणार आहे. त्यांनतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल नंबर देऊन समोरील फॉर्म मधे मागितलेली आवश्यक ती सगळी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी जनरेट करावा लागेल. यानंतर, तुमच्या दिलेल्या मोबाइल नंबरवर आलेला OTP तुम्हाला पुढे टाकावा लागेल. या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

Leave a Comment