Cibil Score म्हणजे काय? त्याचे महत्त्व आणि तो कसा चेक करायचा?

सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर चे महत्त्व तेव्हा लक्षात येते जेव्हा तुम्ही लोन घेण्यासाठी जाता किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असता. एक चांगला सिबिल स्कोर तुम्हाला कमी व्याजावर जास्त कर्ज मिळवून देऊ शकतो. पण सिबिलचा कर्जाशी काय संबंध आहे आणि तो नक्की काय असतो, हे समजून घेऊया.

Cibil Score काय असतो?

बँक सिबिल स्कोरच्या माध्यमातून हे पाहते की कर्जदार लोन परत करण्यास सक्षम आहे की नाही. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असतो, ती व्यक्ती सहजासहजी ईएमआई भरू शकते, असे बँक मानते. कारण सिबिल स्कोर हा कोणत्याही व्यक्तीची जुनी लोन परत करण्याची क्षमता आणि क्रेडिट कार्डचे बिल कधी केले गेले, हे सर्व पाहून ठरवला जातो.

आता जाणून घेऊया की तुम्ही तुमचा सिबिल स्कोर कसा चेक करू शकता.

सिबिल स्कोर कसा चेक करायचा?

स्टेप 1 – सर्वात आधी तुम्हाला यासाठी सिबिल स्कोरची ऑफिशियल Website  www.cibil.com वर जावे लागेल.

स्टेप 2 – त्यानंतर येथे विचारलेली माहिती भरून लॉगिन करा.

स्टेप 3 – जर तुम्ही पहिल्यांदाच वापर करत असाल तर  रजिस्ट्रेशन देखील करावे लागेल.

स्टेप 4 – आता तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्म तारीख, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर इत्यादी भरा.

स्टेप 5 – मोबाईल नंबर भरल्यानंतर तुम्हाला Generate OTP वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 6 – यानंतर मोबाईल वर आलेल्या ओटीपीची प्रविष्ट करा.

स्टेप 7 – त्यानंतर  फ्री ऑप्शनया पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 8 – शेवटी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचा सद्या असलेला सिबिल स्कोर दिसून येईल.

Leave a Comment