Polyhouse Subsidy Scheme 2024: ‘पॉली हाऊस सबसिडी योजना’अंतर्गत मिळेल 23 लाख रूपयांचे अनुदान!

Polyhouse Subsidy Scheme 2024 : पॉली हाऊस मुके पिकांचे उत्पादनात वाढ तर हो, शिवाय पिकांची प्रतही चांगले राहते. त्यामुळे देशातील शेतकरी पॉली हाऊसमध्ये (Polyhouse) शेती करण्यावर भर देतात. पॉलि हाऊस शेती करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार अनुदान देत असून तुम्हाला सुद्धा अर्ज करता येतो. जाणून घेऊ यासाठी असलेली योजना (Polyhouse Subsidy Scheme) आणि मिळणारे अनुदान याबद्दल माहिती.

Polyhouse Subsidy Scheme 2024
Polyhouse Subsidy Scheme 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Polyhouse Subsidy Scheme अंतर्गत इतके मिळेल अनुदान

ग्रीन शेडनेट (Green Shade Net) हाऊस बांधण्याकरिता लागणारी रक्कम शेतकरी संबंधित जिल्हा फलोत्पादन विकास सोसायटीकडे जमा करेल. ग्रीन हाऊस चे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती शेतकर्‍याने कार्यालयात दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत ग्रीन हाऊस ची भौतिक पडताळणी केली जाईल.

हरित शेडनेट हाऊस-वर शेतकऱ्याचे नाव, एकूण क्षेत्र, स्थापन केलेलं वर्ष, National Agricultural Development Scheme (राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत) अनुदानित लिहावं लागणार आहे.

शेतकऱ्यांना प्रती यूनिट खर्चाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम अनुदान म्हणजेच Subsidy म्हणून देण्यात येणार आहे. मात्र अत्यल्प, अल्प, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील शेतकर्‍यांना वीस टक्के अनुदान म्हणजेच Subsidy राज्य योजना प्रमुखातर्फे देण्यात येते. याचा अर्थ असा आहे कि, या शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळू शकणार आहे.

यासाठी आपल्याला Polyhouse Subsidy Scheme म्हणजेच पॉलिहाऊस योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Polyhouse Subsidy Scheme अंतर्गत राज्य सरकार (State Government) शेतकऱ्याना 23 लाख रूपयांचा पर्यंत अनुदान देत असून अनुदानाचा हा आकडा राज्य निहाय वेगळा असू शकतो.

एक हजार स्क्वेअर मीटरचे पॉलीहाऊस बांधण्याकरिता जवळपास 33 लाख 76 हजार रुपये एवढा खर्च येतो, म्हणजेच प्रत्येक प्रति चौरस मीटरकरिता 844 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना सत्तर टक्के अनुदान मिळाल्यानंतर 23 लाख रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. आणि त्याचबरोबर शेडनेट हाऊसच्या बांधणीकरिता जवळपास 28 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 19 लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येईल.

Polyhouse Subsidy Scheme च्या पात्रता व अटी

 • प्रत्येक लाभार्थीला जास्तीत जास्त 4 हजार चौरस मीटरपर्यंत अनुदान दिलं जातं.
 • ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊसचे काम हे केवळ कंत्राटी फर्मच्या माध्यमातून करणं गरजचं आहे.
 • ग्रीनहाऊस, शेडनेट हाऊसवर बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती राहणार नाही.
 • शेतकऱ्यांना कर्जाची गरज लागल्यास, सहाय्यक संचालक किंवा कृषी उपसंचालक यांच्या माध्यमातून देण्यात येईल.
 • बँकेच्या माध्यमातून ग्रीनहाऊस उभारणीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या किंमतीनुसार कर्ज देण्यात येईल.
 • जमिनीचे पडताळणी पॉलिहाऊस शेतीसाठी केली जाणार आहे.
 • पाणीसाठा आणि विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे.

Polyhouse Subsidy Scheme साठीची आवश्यक कागदपत्रे

 • सातबारा, आठ अ उतारा
 • शेतकर्‍यांचे आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • जातीचा दाखला
 • शेडनेट / पॉलिहाऊस कोटेशन
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी या वेबसाईटवर भेट द्या

Leave a Comment