POCRA scheme 2024: POCRA प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!

POCRA scheme: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, राज्यात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम हे जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे विविध टप्प्यातील काम पूर्ण होणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम ३० जून रोजी संपणार आहे. प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या सेवाही बंद करण्यात येणार आहेत.

POCRA scheme
POCRA scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विदर्भ-मराठवाड्यातील १६ जिल्ह्यांमध्ये हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि कृषी अर्थव्यवस्था फायदेशीर बनवून आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला.

POCRA scheme project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी १.२० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मंजुरी

हा प्रकल्प सुरुवातीला सहा वर्षांसाठी असल्याचा जाहीर करण्यात आला होता. मात्र आता POCRA ०.२ ची अंबलबजावनी केली जाणार असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याची आवराआवर सुरू आहे.

POCRA 2.0: POCRA-2 ची अंमलबजावणी भागधारकांच्या मतावर आधारित असेल

गेल्या आठवड्यात प्रकल्प संचालक परिमल सिंग यांच्या द्वारे काढण्यात आलेल्या पत्रानुसार ग्राम कृषी संजीवनी समिती स्तरावर कार्यालयीन अभिलेख अद्ययावत व हस्तांतरण, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जडसंग्रहाची संकलन नोंदवही अद्ययावत व हस्तांतरण, प्रकल्पातील सर्व संगणकांची माहिती सुरक्षित ठेवणे, त्याचा बॅकअप घेणे, प्रकल्पांतर्गत सर्व थकबाकीदार कागदपत्रांवर प्रक्रिया करणे, ग्राम कृषी संजीवनी समितीचे असलेले बँक खाते बंद करणे, लेखापरीक्षणात उपस्थित केल्या गेलेल्या मुद्द्यांचे लेखापरीक्षण व निराकरण अहवाल संबंधित लेखापरीक्षकांना सादर करणे आदी सूचना केल्या गेल्या आहेत.

कंत्राटी कर्मचारी फक्त ३० जूनपर्यंतच

या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेले कंत्राटी कर्मचारी फक्त ३० जून २०२४ पर्यंतच कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. यानंतर मात्र या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त होणार आहेत. परिमल सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करून 15 मे पर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. POCRA project

Leave a Comment