Pik Vima 2024 list : 75% पीक विमा कधी उपलब्ध होईल? पात्र शेतकऱ्यांची यादी तपासा!

Pik Vima 2024: नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण सरकारच्या नव्या GR बद्दल जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शासनाने उर्वरित 75 टक्के पीक विमा मंजूर केला असून हा पीक विमा 11 मार्च ते 31 मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. हा पीक विमा (Pik Vima 2024) अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा सुद्धा झाला असल्याचे कळून येत आहे.

Pik Vima 2024
Pik Vima 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता उर्वरित शेतकऱ्यांना हा पीक विमा कधी मिळणार? असेच काही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पूर्व माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे मात्र यामध्ये 2024 पासून अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. आज आपण यामागील कारण काय आहे? आणि शेतकऱ्यांना हा पीक विमा कसा मिळू शकतो याबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांसाठी 75 टक्के पीक विमा भरपाई मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला शासनाकडून हेक्टरी 24 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देखील दिले जाणार आहे. चला तर मग याबद्दलची अधिक माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो, सरकारने 75 टक्के पीक विम्यासाठी सुमारे 2000 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 35 लाख शेतकरी या 75 टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत. ज्याची माहिती आम्ही पुढे दिलीच आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत हे तुम्ही वाचू शकता आणि प्रत्येक जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत ते तुम्ही पुढे पाहू शकता.

पुढे दिलेली माहिती ही पात्र जिल्हा, त्यांनतर मंजूर रक्कम आणि लाभार्थी शेतकरी अशा प्रकारे आहे.

 • अमरावती जिल्ह्याला 8 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 10,256 आहेत.
 • लातूर जिल्ह्याला 244 कोटी 87 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 2,19,535 आहेत.
 • नागपूर जिल्ह्याला 52 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 63,422 आहेत.
 • परभणी जिल्ह्याला 206 कोटी 11 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 4,41,970 आहेत.
 • जालना जिल्ह्याला 160 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 3,70,625 आहेत.
 • कोल्हापूर जिल्ह्याला 13 लाख 228 रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांची संख्या अजून निश्चित नाही.
 • अकोला जिल्ह्याला 97 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 1,77,253 आहेत.
 • धाराशिव जिल्ह्याला 218 कोटी 85 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 4,98,720 आहेत.
 • बुलढाणा जिल्ह्याला 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 36,358 आहेत.
 • बीड जिल्ह्याला 241 कोटी 41 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 7,70,574 आहेत.
 • सांगली जिल्ह्याला 22 कोटी 4 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 98,372 आहेत.
 • सातारा जिल्ह्याला 6 कोटी 74 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 40,406 आहेत.
 • सोलापूर जिल्ह्याला 111 कोटी 41 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 1,82,534 आहेत.
 • अहमदनगर जिल्ह्याला 160 कोटी 28 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 2,31,831 आहेत.

तर शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली आणि त्यानंतर जून आणि ऑगस्ट महिन्यात 21 दिवसांपेक्षाही जास्त दिवस पाऊस पडला. त्यानंतर, जागेवरील पीक उत्पादनात 50% पेक्षा जास्त घट झाली असल्याचं शेतकऱ्यांना जाणवू लागलं. आपल्याला यंदा काही चांगले उत्पन्न मिळणार नसल्याची गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात आली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांचा पीक विमा (Pik Vima 2024) देखील काढला होता.

यानंतर 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी पीक विमा (Pik Vima 2024) देखील जाहीर करण्यात आला होता. यानंतर दिवाळीमधे शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विम्याचे देखील वाटप करण्यात आले होते, त्यात 1700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार ते 24 हजार रुपये मिळाले. आता शेतकऱ्यांना 75 टक्के पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार ते 80 हजार रुपये मिळतील आणि हे पैसे 11 मार्च ते 31 मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, असा जीआर सरकार द्वारे जाहीर करण्यात आला आहे.

Pik Vima 2024List Maharashtra 2023-24: यादी कशी पाहाल?

 • पिक विमा (Pik Vima 2024) यादी पाहण्यासाठी, तुम्हाला प्रधानमंत्री सर्वात आधी पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 • त्यांनतर तिथे तुम्हाला क्रॉप स्टेटस लिहिलेलं दिसून येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
 • यापुढे तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
 • पुढे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरणे आवश्यक असणार आहे.
 • यानंतर तुम्हाला पिक विमा यादी दिसून येईल.

Leave a Comment