Crop Management: कांद्यावरील सर्वात खतरनाक रोग -करपा! असा करा करप्याचा पूर्णपणे नायनाट;

Onion Crop Management :- कांदा पीक हे महाराष्ट्र राज्यांमधील प्रमुख पिकांपैकीच एक पीक आहे प्रामुख्याने आपण खरीप व रब्बी अशा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतो. परंतु आपण कांद्याचा सखोल अभ्यास केला तर मागील काही वर्षापासून हवामानामध्ये जे काही बदल झाले म्हणजे अवकाळी पाऊस किंवा दोघे इत्यादी कारणांमुळे कांद्यावर विविध प्रकारचे रोग येत असताना आपल्याला दिसत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना अशावेळी कीटकनाशक, बुरशीनाशक, फवारणी फवारणी करावी लागत आहे; आणि यामुळे खर्च सुध्दा वाढत आहे. यामध्ये जर फवारणीचे व्यवस्थापन चुकले तर आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो असे सुद्धा काही ठिकाणी दिसून आले आहे.

या रोगांमध्ये आपण बघितले तर करपा रोग हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून आला आहे; हा एक गंभीर रोग असून, कांदा उत्पन्न या रोगामुळे प्रचंड प्रमाणावर घसरते. या अनुषंगाने आजच्या लेखामध्ये आपण करपा रोग नियंत्रण व त्यावरील उपाय योजना जाणून घेणार आहोत. कृपया लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.

कांदा पिकावरील करपा रोगाचे प्रकार

1- अल्टरनेरिया करपा

खरीप हंगामा मधील दमट ढगाळ तसेच पावसाळी वातावरणामुळे या प्रकारच्या करप्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कांदा पिकावर आढळून येतो. या प्रकारांमध्ये अगदी सुरुवातीच्याच कालावधीत कांद्याच्या पातीवर लहान खोलगट तसेच पांढऱ्या प्रकारचे चट्टे पडतात व शेंड्यापासूनच ही सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि हे खालच्या बाजूला सरकत जाते.

या सत्या मधील भाग पूर्णपणे जांभळट लालसर रंगाचा आपल्याला पाहायला मिळेल, तसेच याचा कडा पिवळसर दिसेल. हवामान जर दमट असेल तर अशावेळी नक्कीच या प्रकारच्या करप्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो, व चट्ट्याच्या ठिकाणी तपकिरी किंवा काळपट बुरशी सुद्धा वाढते. त्यामुळे पात शेंड्यापासून जाळायला सुरुवात होते.

यासोबतच बीजोत्पादनासाठी आपण कांदे लावले असतील; आणि अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला दांड्यावरच हे काळी चट्टे दिसून येतात. आणि यामुळे गोंड्यामध्ये मी भरतच नाही आणि दांडी मोडून खाली कोलमडतात. सुरुवातीच्या कालावधीमध्ये हा रोग आढळून आला आणि नियंत्रण नाही केले तर पाच पूर्णपणे जळते आणि पिकाची वाढ थांबते. आणि कांदा पोहचला नाही तर कांद्याची चिंगळीच आहे. तशी राहते जेव्हा कांदा पोहचत असतो. त्यावेळी रोग आला तर बुरशीचा प्रादुर्भाव थेट कांद्यापर्यंत पसरतो. यासोबतच कांदा सोडायला लागतो आणि अशा वेळेस कांद्याची चाळीत टाकून सुद्धा टिकत नाही.

2- कोलीटोट्रीकम करपा

याला काळा करपा रोग देखील म्हटले जाते याचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये आपल्याला दिसून येतो. या प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला आढळून आला तर सुरुवातीलाच पानावर व मानेवर वर्तुळाकार डाग पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने जमिनीमधूनच पाण्याचा निचरा होत नसेल तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. शेवटी कांदा सोडून जातो.

3- स्टेम्फीलीयम करपा

हा एक तपकिरी प्रकारच्या करपा असून, रब्बी हंगामामध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्तीत जास्त दिसून येईल ज्यावेळी सुरुवातीला याचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी पानावर तपकिरी साठी आपल्याला दिसतात आणि त्यांचे प्रमाण बुंध्याकडून शेंड्याकडे वाढत जाते. यासोबतच पाणी तपकिरी पडून वाळून जातात. पाच सुकल्यामुळे कांदे पोसवत नाहीत.

या उपायोजना ठरतील फायद्याच्या

पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी उपाययोजना

बियाणाची पेरणी करत असताना त्यापूर्वीच कॅप्टन दोन ग्रॅम + बाविस्टीन दोन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन कांद्याच्या बियाण्याला पूर्णपणे बीज प्रक्रिया करून घ्यावी. तसेच पिकाची फेरपालट करणे आवश्यक आहे. ज्या जमिनीमध्ये तुम्हाला लागवड करायची आहे, ती जमीन उन्हाळ्यामध्ये चांगली करून घ्यावी आणि पूर्णपणे तापवून घ्यावी.

रोपवाटिका नियोजन

1- रोपवाटिकेमध्ये रोपांची उगवण झाल्यानंतर 15 दिवसांपासून सर्वात प्रथम मॅन्कोझेब 25 ग्रॅम+ डायमेथोएट 15 मिली+ स्टिकर द्रव्य दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करावे आणि दोन वेळा फवारणी करून घ्यावी.

2- यासोबतच कांद्याची पुन्हा लागवड करत असताना त्यापूर्वी कांद्याच्या रोपांची मुळे मॅन्कोजेब 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन द्रावण तयार करावे. आणि त्या द्रावणामध्ये कमीत कमी पाच ते दहा मिनिटे बुडवून ठेवावीत आणि मगच पुढे लागवड करावी.

लागवडीनंतरचे नियोजन

लागवडीनंतर करपा तसेच फुल किडे याचे नियंत्रण करायचे असेल तर लागवड केल्यानंतर रोगांची लक्षणे आपल्याला प्लॉटवर पाहायला मिळाली तर दहा दिवसांच्या अंतराने अझोक्सिस्टॉबीन दहा मिली किंवा टॅब्युकोनॅझोल दहा मिली या बुरशीनाशकांची फवारणी केली तर चांगला रिझल्ट मिळेल. जांभळा करपा तसेच काळा करपा या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यामधून ही फवारणी करावी.

किंवा तुम्ही या ठिकाणी मॅन्कोझेब 30 ग्रॅम; तसेच फिप्रोनील 5 एससी 15 मिली, प्रोफेनोफॉस 50 इसी 10 मिली; या ऐवजी कार्बोसल्फान 25 ईसी दहा मिली या ऐवजी सायपरमेथ्रीन पाच मिली; अधिक स्टिकर दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करावे आणि फवारणी करावी. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे यासाठी तुम्ही व्हर्टिसिलियम किंवा मेटॅरिझम हे जैविक बुरशीनाशक या औषधाची प्रदीप पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून किमान पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. या तीन फवारण्या कराव्यात.

अशाप्रकारे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन केले तर नक्कीच या रोगांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

Leave a Comment