nabard loan | दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड देत आहे बंपर सबसिडी! आता बिनधास्त सुरू करा आपला दुग्ध व्यवसाय;

शेतकरी बंधू-भगिनींनो नमस्कार, शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन नियमितपणे नावीन्यपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. त्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी खरोखरच आपली उन्नती करत आहेत व आर्थिक प्रगती साधत आहेत. अशातच आता प्रशासनाच्या माध्यमातून नाबार्ड शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरिता कर्जही उपलब्ध करून देत आहे व त्या कर्जावर बंपर सबसिडी देखील देत आहे.

nabard loan in marathi

तर नक्की या कर्ज सुविधेचा व अनुदानाचा लाभ कोणाकोणाला घेता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर सर्वच शेतकरी, यासोबतच स्वतःचा आधीपासून शेतीपूरक व्यवसाय असणारे शेतकरी, स्वयंसेवी संस्था, या सोबतच विविध कंपन्या, याशिवाय विविध दुग्ध सहकारी संस्था, दुग्ध संघ हे या योजनेचा लाभ घेऊ शकतील…

nabard schemes in marathi

ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास करण्यासाठी प्रशासन पशुपालना संबंधित विविध योजना राबवण्यावर भर देत आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणावर गावकरी घेऊ शकणार आहेत आणि भरपूर नफा मिळवू शकणार आहेत. स्वतः सरकार शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून शासन पशुपालकांना आर्थिक मदत सुद्धा करत आहे. विविध बँकेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते. शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे दुग्ध व्यवसाय सुरू करता यावा यासाठी नाबार्ड भरीव अनुदान सुद्धा देत आहे.

what is nabard scheme

नाबार्ड सबसिडी चा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करावा? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2005 – 06 या वार्षिक कालखंडामध्ये नाबार्डच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून “दुग्ध व पोल्ट्री उद्योग भांडवल योजना” या नावाने पथदर्शी योजना राबवण्यात आली होती. पुढे डेरी उद्योजकता विकास असे नाव 2010 मध्ये निश्चित केले. नाबार्ड अंतर्गत राबविण्यात आलेल्या या योजने करिता शेतकरी यासोबतच विविध पात्र असणाऱ्या कंपन्या दूध संघ या योजनेचा लाभ घेत आले आहेत.

nabard scheme for dairy farming in maharashtra

नाबार्डच्या माध्यमातून इतकी मिळेल सबसिडी!

कुटुंबामधील एकापेक्षा अधिक सदस्यांना सुद्धा या योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात येते. जर त्यांनी स्वतः वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून वेगवेगळ्या जागेवर स्वतःचे युनिट स्वतंत्ररित्या स्थापन केले असेल तर नक्कीच याचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी किती भेटते? तर नाबार्ड शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या खर्चाच्या 25% पर्यंत सबसिडी उपलब्ध करून देते आणि जर एखादी व्यक्ती एस सी एस टी कास्ट मधील असेल तर नाबार्ड त्यांना ते 30% पर्यंत सबसिडी देते.

नाबार्ड सबसिडी चा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करावा? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment