अशा प्रकारे मिळते सबसिडी!

दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा दूध प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी जर आपल्याला नाबार्डच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घ्यायचे असेल तर आपल्याजवळील नाबार्डच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. त्या ठिकाणी अर्ज सादर करावा व अर्ज संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी. अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते. आणि पडताळणी केल्यानंतर तुम्ही या योजनेस पात्र ठरता आणि तुम्हाला नाबार्डच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर तुम्हाला 25% प्रमाणे किंवा 33% प्रमाणे सबसिडी उपलब्ध होते.

दुग्ध व्यवसाय योजनेच्या माध्यमातून जे कोणी शेतकरी अनुदानास पात्र आहेत त्यांनी दुग्ध व्यवसायामधील प्रकार निवडावा. नंतर तुमचा दुग्ध व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय संबंधित कंपनी म्हणजेच दूध प्रक्रिया उद्योग किंवा एनजीओ म्हणून नोंदणी केली आहे की नाही याची खात्री करावी. नंतर पुढे कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी बँकेच्या माध्यमातून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. सुरुवातीला ईएमआय म्हणून थोडीफार कर्जाची रक्कम भरावी. अशावेळी बँकेच्या माध्यमातून ईएमआय चे काही विशिष्ट हप्ते माफ केले जातील. यानंतर पुढे ईएमआय वर जी आपल्याला सवलत दिली जाते त्या सवलतीच्या माध्यमातून आपल्याला रक्कम नाबार्डच्या अनुदानातून प्रदान केली जाते.