घरबसल्या कमवा लाख रुपये ! कमी खर्चात करा या शेतीचे नियोजन;

शेती करत असताना शेतीसोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनांचे रूपांतर तुम्ही व्यवसाय मध्ये देखील करू शकता. यासाठीच आज आपण घेऊन आलो आहोत मशरूम लागवडी बद्दलची सर्व माहिती व त्याचे फायदे कोणकोणते आहेत. मशरूम एक बुरशी पदार्थ असून त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक व तत्वे देखील असतात. मशरूम हे खायला स्वादिष्ट असून आरोग्याला देखील खूप फायदेशीर व चांगले असते. mashroom farmimg

मशरूम शेतातील संधी

मशरूम पीक हे सध्याच्या काळात हॉटेल लाईन मध्ये सगळ्यात जास्त चालणारा पदार्थ आहे व त्याची डिश सुद्धा सर्वात महागडे पाहायला मिळते. तुम्ही जर व्यापारी दृष्टिकोनातून मशरूम या शेतीची लागवड केली तर तुम्ही कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा देखील मिळू शकतात. अनेक प्रकारच्या मोठ्या हॉटेलमध्ये मशरूम याला खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे.

मशरूम या पिकाची लागवड कशी करावी ?

मशरूम या पिकासाठी तुम्हाला कुठल्याही मोठ्या जागेचे किंवा शेताचे गरज नाही तुम्ही हे अगदी कमीत कमी जागेत सुद्धा करू शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या घरातील एका खोलीमध्ये सुद्धा मशरूम या पिकाची लागवड करू शकता. मशरूम या पिकाचे लागवड करत असताना तुम्हाला थोड्या प्रमाणात कंपोस्ट खताची आवश्यकता असते व त्याचप्रमाणे या कंपोस्ट खतावर याच्या बिया पेरल्या जातात आणि कंपोस्ट बनवताना तुम्हाला भात किंवा गव्हाच्या पेंड्याचा वापर करावा लागतो.

जर तुम्हाला मशरूमचे चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला तापमानाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे याकरिता तुम्हाला 18 सेंटी डिग्री 33 सेंटी डिग्रीपर्यंत तापमान मेंटेन करून ठेवावे लागेल. सध्याच्या काळामध्ये मशरूमच्या बाजारामध्ये अशा काही प्रजाती आल्या आहेत की त्या प्रजाती तुम्ही वर्षांमध्ये कधीही लागवड करू शकता. सर्वसाधारणपणे मशरूम या पिकाचे चार प्रकार असतात ते म्हणजे दुधाळ मशरूम, बटन मशरूम, ऑईस्टर मशरूम, स्ट्रॉं मशरूम.

मशरूम या पिकाची बाजारपेठ

जर आपण सध्याचा बाजार दर पाहिला तर प्रति किलो 700 ते 1000 रुपये असा विकला जातो. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट ,मॉल, सुपर मार्केट इत्यादी ठिकाणी याला चांगली मागणी आहे. उत्पादकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की जर तुम्ही त्याचे उत्पादन व्यवस्थित घेतले व आकर्षक एजिंग करून त्याची विक्री केली तर नक्कीच तुम्हाला चांगला दर मिळून जाईल व उत्तम प्रतीचा फायदा देखील होईल.

mashroom farming maharashtra

Leave a Comment