Mudra loan scheme 2024: तरुणांनो, व्यवसाय करण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, व्याजदर ही अत्यंत कमी!

Mudra loan scheme 2024: नागरिकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अत्यंत फायदेशीर असल्याचं दिसून येत आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना व्यावसायिक गोष्टींसाठी 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. फक्त व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज देण्यात येते. सरकार द्वारे एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत देशातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

Mudra loan scheme 2024
Mudra loan scheme 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. स्वयंरोजगार असलेल्या नागरिकांना एकत्र आणणे हा या योजनेचा पहिला उद्देश तर दुसरा उद्देश लहान उद्योगांना मोठा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा असून या योजनेअंतर्गत नागरिकांना व्यवसाय विस्तारासाठी कर्जही उपलब्ध करून दिले जाते.

आतापर्यंत अनेक नागरिकांनी Mudra loan scheme योजनेतून कर्ज घेतले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना साध्या व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळेच अनेक नागरिक या योजनेतून कर्ज घेतात. आणि ही योजना नागरिकांसाठी लहान व्यवसाय उभारण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या योजनेचा लाभ बहुतांश महिलांना मिळत आहे. मुद्रा योजनेची एक महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्या प्रत्येक चार नागरिकांपैकी तीन ह्या महिला लाभार्थी आहेत.

लाखो नागरिक घेत आहेत Mudra loan scheme योजनेचा लाभ

मुद्रा कर्ज योजनेंतर्गत लाभार्थीला कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते. ही या योजनेची सर्वात विशेष गोष्ट आहे. तसेच या योजनेद्वारे कर्ज मिळवण्यासाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळेच ही योजना अतिशय फायदेशीर आणि झटपट कर्ज देणारी योजना बनली आहे. तसेच या योजनेतून कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्या नागरिकांना मुद्रा कार्डही देण्यात येणार आहे.

Who are the beneficiaries under Mudra loan scheme

मित्रांनो, मुद्रा कर्ज योजना ही आता सर्वात सोपी कर्ज योजना म्हणून देखील ओळखली जात आहे. या योजनेचा फायदा असा आहे की, देशातील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, तो या PMMY योजनेद्वारे कर्ज घेऊ शकतो. जर तुमचा एखादा छोटा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायाला पुढे नेऊ इच्छित असाल, तर तुम्ही तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी या योजनेद्वारे 10 लाख रुपयांपर्यंतच्या सुलभ कर्जासाठी अर्ज करू शकणार आहात.

मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारे कर्ज दिले जाते. या तीन पद्धती काय आहेत ते जाणून घ्या | Types of Mudra loan scheme

  • पहिली पद्धत म्हणजे शिशू कर्ज: शिशू कर्ज लाभार्थी नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते.
  • दुसरी पद्धत म्हणजे किशोर कर्ज: या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना 50,000 ते 5,000 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • तिसरी पद्धत म्हणजे तरुण कर्ज: तरुण कर्ज प्रक्रियेत लाभार्थी नागरिकाला 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. याशिवाय या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरही खूप कमी आहे.

मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज कसे मिळवायचे? How to get loan from Mudra loan scheme

या Mudra loan scheme योजनेद्वारे कर्ज मिळविण्यासाठी, नागरिकांना त्यांच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँके शाखेमधे जाऊन दिल्या गेलेल्या योग्य नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या घराची किंवा भाड्याने घेतलेल्या घराची मालकी कागदपत्रे, तसेच तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी सादर करावे लागतात.

त्या बँकेचा व्यवस्थापक तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, तुम्ही तो कुठे करणार आहात, तुमचा व्यवसाय कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, तुमच्या व्यवसायात काय धोके आहेत इत्यादी तपासतील. तुमच्या उद्योगाच्या आकारानुसार शाखा व्यवस्थापक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायला सुद्धा सांगू शकतो.

Phone pe घरबसल्या देणार 5 लाख रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

Leave a Comment