आता WhatsApp, Instagram आणि Facebook वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे – मेटाचा मोठा निर्णय

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मेटाने आपल्या प्रमुख ॲवप्ससाठी — Facebook, Instagram आणि WhatsApp — पेड सब्सक्रिप्शन प्लॅन जागतिक स्तरावर लॉन्च केले आहेत. या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीय युजर्सच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे — आता सोशल मीडिया वापरायला पैसे द्यावे लागणार का?

Meta सब्सक्रिप्शन प्लॅन म्हणजे काय?

मेटाने तीन वेगळे “Plus” प्लॅन जाहीर केले आहेत —

  • Instagram Plus ($3.99/महिना),
  • Facebook Plus ($3.99/महिना) आणि
  • WhatsApp Plus ($2.99/महिना).

या प्लॅन्समध्ये प्रोफाइल कस्टमायझेशन, सुपर रिअॅक्शन्स आणि स्टोरी इनसाइट्स यांसारख्या एक्सक्लुझिव्ह सुविधा मिळतील.

मेटाच्या प्रोडक्ट हेड नाओमी ग्लेट यांनी Instagram वर एक व्हिडिओ पोस्ट करून हे प्लॅन्स जाहीर केले.

Facebook Plus आणि Instagram Plus मध्ये काय मिळणार?

Instagram Plus आणि Facebook Plus हे प्लॅन्स प्रामुख्याने सोशल एक्स्प्रेशन वर केंद्रित आहेत, तर WhatsApp Plus पर्सनलायझेशन आणि मेसेजिंग वर भर देतो. पेड सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सला Instagram किंवा Facebook Stories वरील डिटेल्ड स्टॅटस पाहता येतील, व्हॅनिशिंग पोस्ट्स २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवता येतील, आणि कस्टम थीम्स व रि ॲक्शन्स वापरता येतील.

WhatsApp Plus मध्ये काय असेल?

WhatsApp Plus हा प्लॅन इतर दोनपेक्षा थोडा स्वस्त ($2.99/महिना) आहे. यात प्रीमियम स्टिकर्स, कस्टम रिंगटोन्स आणि ॲप थीम्स यांसारख्या पर्सनलायझेशन सुविधा देण्यात येतील.

मोफत ॲप बंद होणार का?

नाही. Facebook, Instagram आणि WhatsApp हे ॲप्स मोफतच राहणार आहेत. पैसे फक्त “Plus” फीचर्ससाठी आकारले जाणार आहेत — संपूर्ण ॲपसाठी नाही.

Meta One म्हणजे काय?

मेटा आपल्या सर्व सब्सक्रिप्शन्स एकत्र आणण्यासाठी “Meta One” हे नवीन ब्रँड तयार करत आहे. यात AI युजर्ससाठी $7.99/महिना (Meta One Plus) आणि $19.99/महिना (Meta One Premium) असे प्लॅन्स असतील, तर क्रिएटर्स आणि बिझनेससाठी $14.99/महिनाचा Meta One Essential प्लॅन असेल.

मेटाने हा निर्णय का घेतला?

जाहिरात-आधारित बिझनेस मॉडेलपलीकडे जाऊन आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी मेटाने हे पाऊल उचलले आहे. कंपनी AI डेटा सेंटर्सवर प्रचंड गुंतवणूक करत असून, गुंतवणूकदारांच्या दबावामुळे नव्या महसुलाचा मार्ग शोधणे आवश्यक बनले होते.

मार्च महिन्यात Instagram Plus च्या टेस्टिंगचे स्क्रीनशॉट्स ऑनलाइन समोर आले होते, आणि आता हे प्लॅन्स अधिकृतपणे जागतिक स्तरावर रोलआउट होत आहेत.

तुमचा निर्णय काय?

Instagram Plus किंवा Facebook Plus घेण्याचा विचार करत आहात का? खाली कमेंट करा!

Leave a Comment