Credit score calculation | कर्ज घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरतो?

Credit Score हा 300 ते 900 दरम्यान असलेला तीन अंकी आकडा असून तो तुमची आर्थिक विश्वासार्हता दर्शवतो. बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देताना तुमचा धोका किती आहे, हे समजण्यासाठी याच स्कोअरचा आधार घेतात. स्कोअर जितका जास्त, तितकी कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. CIBIL Score Check

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

क्रेडिट स्कोअर तुमच्या भूतकाळातील आर्थिक व्यवहारांवर आधारित असतो. उदा. कर्जाची परतफेड, ईएमआय भरण्याची सवय, क्रेडिट कार्ड वापर इत्यादी. हा स्कोअर वेळोवेळी बदलू शकतो आणि योग्य आर्थिक सवयी ठेवून 6 महिने ते 1 वर्षात सुधारता येतो.

क्रेडिट स्कोअर कोण तयार करतात?

भारतामध्ये Reserve Bank of India (RBI) द्वारे नियमन केलेल्या खालील क्रेडिट ब्युरो (CICs) तुमचा स्कोअर तयार करतात :

  • TransUnion CIBIL
  • Experian
  • Equifax
  • CRIF High Mark

प्रत्येकाची गणना पद्धत थोडी वेगळी असली, तरी तुमची एकूण आर्थिक स्थिती साधारणसारखीच दिसते.

हे सुद्धा वाचा – “Low CIBIL Score असूनही Home Loan मिळू शकतो का? – 20-30-40 फॉर्म्युला वापरून लाखो वाचवा

क्रेडिट स्कोअर ठरवणारे मुख्य घटक

  1. परतफेडीचा इतिहास – वेळेवर ईएमआय, क्रेडिट कार्ड बिल भरल्यास तुमचा स्कोअर सुधारतो. उशीर किंवा डिफॉल्ट केल्यास तो कमी होतो.
  2. क्रेडिट युटिलायझेशन – तुमच्या उपलब्ध क्रेडिट लिमिटपैकी किती वापरता हे महत्त्वाचे. 30 टक्केपेक्षा कमी वापर ठेवणे योग्य मानले जाते.
  3. सक्रिय कर्जांची संख्या – एकाचवेळी खूप कर्जे असल्यास तुमची परतफेड क्षमता कमी वाटू शकते.
  4. क्रेडिटचा प्रकार – सिक्युअर्ड (उदा. होम लोन) आणि अनसिक्युअर्ड (उदा. पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड) यांचा संतुलित वापर फायदेशीर ठरतो.
  5. नवीन कर्ज अर्ज – वारंवार कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

क्रेडिट स्कोअर कसा सुधारावा?

  • वेळेवर ईएमआय आणि बिले भरावीत.
  • क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवावा.
  • कर्ज डिफॉल्ट किंवा सेटलमेंट टाळावी.
  • जुनी खाती सक्रिय ठेवावीत.
  • कर्ज फक्त आवश्यक तेव्हाच घ्यावे.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट कसा मिळवावा?

वरील सर्व क्रेडिट ब्युरो दरवर्षी एक Free Credit Report देतात. हा रिपोर्ट पाहून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती तपासू शकता आणि चुका असल्यास दुरुस्त करू शकता. क्रेडिट स्कोअर हा फक्त आकडा नसून तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा आहे. योग्य नियोजन, वेळेवर परतफेड आणि जबाबदार खर्च केल्यास तुम्ही तुमचा स्कोअर सहज वाढवू शकता आणि भविष्यात कर्ज मिळवणे अधिक सोपे करू शकता.

Leave a Comment