महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या पशुपालन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने Kisan Credit Card (केसीसी) ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
हे सुद्धा वाचा – Land Loan Process: प्लॉट खरेदीसाठी मिळणार पाहिजे तेवढं कर्ज; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन आणि दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आपल्या व्यवसायासाठी सावकाराकडे जाण्याची गरज उरणार नाही.
योजनेचे स्वरूप आणि लाभ
या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि पशुधनाच्या संगोपनासाठी ३ लाख रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.
विनातारण कर्ज:
ज्या पशुपालकांकडे अद्याप क्रेडिट कार्ड नाही, त्यांना सुरुवातीला ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही सुरक्षिततेशिवाय (विनातारण) दिले जाईल.
मर्यादा वाढवण्याची सुविधा:
ज्या शेतकऱ्यांकडे आधीच शेतीसाठीचे क्रेडिट कार्ड आहे, ते त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाच्या संख्येनुसार आपली कर्ज मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढवून घेऊ शकतात.
Loan for Animal Husbandry:
व्याजात मोठी सवलतपशुपालकांना बँकांकडून मिळणाऱ्या या कर्जावर साधारणतः ९% व्याज आकारले जाते. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ‘वरदान’ ठरणार आहे:
- केंद्र शासनाकडून ३% व्याज सवलत मिळते.
- राज्य शासनाकडून ४% व्याज सवलत मिळते.
- उर्वरित २% सवलत बँकांकडून दिली जाते.
अशा प्रकारे, वेळेवर हप्ते भरणाऱ्या बीड जिल्ह्यातील पशुपालकांना हे कर्ज शून्य टक्के व्याजाने उपलब्ध होणार आहे.
योजनेसाठी आवश्यक अटी (Eligibility)या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे:
नोंदणी: सर्व पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर अधिकृत नोंदणी असणे अनिवार्य आहे.
इतर लाभ: अर्जदाराने केंद्र, राज्य किंवा जिल्हा परिषदेच्या इतर कोणत्याही अनुदानित पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Livestock Schemes अंतर्गत राबवली जाणारी ही मोहीम पशुपालकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे जिल्ह्यातील पशुपालन व्यवसायाला आधुनिक जोड मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा बँकेत संपर्क साधावा