Government Schemes For Women 2024: महिलांना फायदा मिळवून देणाऱ्या या सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का? पहा संपूर्ण तपशील-

Government Schemes For Women 2024: आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनेच्या अंतर्गत महिलांना पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. महिलांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या अंतर्गत महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचे काम अगदी व्यवस्थित रित्या केले जात आहे. चला तर मग आज आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना विषयी.

Government Schemes For Women 2024
Government Schemes For Women 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Government Schemes For Women 2024

1) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC)

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक सरकारची महत्वकांक्षी योजना (Government Schemes For Women) असून महिला बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये या योजनेची सुरुवात केली आहे. सरकारने राबवलेली ही एक ठेव योजना आहे. एकाच वेळी या योजनेमध्ये गुंतवणूक केली जाते (Government). या योजनेचा परिपक्वतेचा कालावधी दोन वर्षांचा आहे. अकरा वर्षापेक्षा अधिक वयाची कोणतीही मुलगी किंवा महिला या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये अगदी सहजपणे गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त दोन लाख रुपये इतक्या रकमेची गुंतवणूक आपण करू शकतो (Women Scheme). सध्या गुंतवणुकीवर 7.5% दिले जात आहे. या माध्यमातून पात्र महिलांना चांगला परतावा मिळतो.

2) पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सन्मान बचत प्रमाणपत्रातही गुंतवणूक करु शकता

महिला पोस्ट ऑफिस किंवा बँकांच्या माध्यमातून सन्मान बचत प्रमाणपत्र मध्ये सुद्धा अगदी बिनधास्तपणे गुंतवणूक करू शकतात. तुम्ही या योजनेमध्ये बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक च्या माध्यमातून सुद्धा अगदी सहजपणे गुंतवणूक करू शकतात (schemes). सर्व सुविधा सर्व बँकांमध्ये एकसारख्याच आहेत.

3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ( PMMVY)

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेली एक महत्त्वकांशी योजना (Government Schemes For Women) आहे. गर्भवती महिला यासोबतच ज्या महिला बाळांना स्तनपान करत आहेत अशा महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही एक महत्त्वाची योजना आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा उद्देश हाच तो म्हणजे महिलांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांच्यामधील कुपोषण पूर्णपणे दूर करणे. त्यांना योग्य तो उपचार देणे आणि औषधांचा खर्च सुद्धा उपलब्ध करून देणे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमध्ये स्तनपान करणाऱ्या महिला तसेच प्रेग्नेंट महिला यांना पाच हजार रुपये दिले जातात. या पाच हजार रुपयांची विभागणी तीन हप्त्यामध्ये केलेली आहे. प्रेग्नेंट महिलांना या योजनेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करत असताना पहिला हप्ता एक हजार रुपयांचा दिला जातो. त्यानंतर सहाव्या महिन्यामध्ये कमीत कमी एका तपासणीनंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळतो. तिथून पुढे तिसऱ्यांदा बाळाचा जन्म झाल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन हजार रुपयांचा शेवटचा हप्ता मिळतो.

4) सुकन्या समृद्धी योजना (SSY)

केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या भवितव्यासाठी नागरिक गुंतवणूक करतात आणि जेणेकरून पालकांना या ठिकाणी शिक्षण-लग्न अशा विविध खर्चाची पूर्तता करत असताना कोणतेही अडचण येऊ नये. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी दहा वर्षाच्या मुलीचे खाते आपण उघडू शकतो. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेचे हेच खाते पूर्णपणे परिपक्व होते. यामध्ये कमीत कमी 250 रुपयांची गुंतवणूक करता येते. एका वर्षांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर आयकर कलम 80 C चा लाभ सुद्धा आपल्याला मिळतो.

sukanya samruddhi yojna 2024