Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana : 100% अनुदानावर मिळवा शेत जमिनी! फक्त हे शेतकरी असतील पात्र; पहा योजनेच्या अटी व नियम;

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमानी योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध घटकांमधील भूमिहीन कुटुंबीयांना शेतजमीन उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु या योजनेअंतर्गत प्रशासनाच्या माध्यमातून ठरवून देण्यात आलेल्या रेडिरेकनर दरानुसारच जमीन खरेदी करण्याची तरतूद केली गेली आहे (agriculture scheme). यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग या दरामध्ये जमीन खरेदी करण्यास तयार नाहीत. यामुळेच आता समाज कल्याण विभाग पुढे ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. दरम्यानच्या कालावधीत मागील पाच वर्षांमध्ये आपण बघितले तर शंभराच्या आताच लाभार्थी व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana
Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

समाजामधील शेवटच्या घटकांपर्यंत या योजनेचा लाभ अगदी व्यवस्थितपणे पोहोचला पाहिजे असे प्रशासनाचे धोरण आहे. यामुळे भूमिहीन शेतमजूर नागरिकांना शंभर टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध करून दिली जाईल. या ठिकाणी दुर्दैव असे की जमीन विक्री करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे (sarkari yojana). अलीकडे कोरडवाहू शेत जमिनीचे दर विविध परिसरानुसार 10 लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत प्रति एकर मागे पोहोचले आहेत. प्रत्यक्षरीत्या या योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये या दराने जमीन खरेदी करण्याचा निकष केला गेला आहे. दुसरीकडे बागायती शेत जमिनीसाठी 27 लाखांपर्यंत खरेदी करण्यासाठीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. परिणाम स्वरूप इतक्या कमी किमतीमध्ये शेती विकण्यास कोणी सुद्धा तयार होत नाही असे दिसत आहे.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana
Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana

काय आहे Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana?

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी तसेच नवबौद्ध घटकांमध्ये दारिद्र्यरेषेखालील जे कोणी शेत मजूर असतील त्यांना अगदी व्यवस्थितपणे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे (latest update) यासोबतच त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवन चांगल्या प्रकारे उंच व्हावे यासाठीच चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेत जमीन देण्याची तरतूद योजनेअंतर्गत केली आहे.

योजनेचे निकष काय?

 • तो भूमिहीन शेतमजूर असावा तसेच दारिद्र रेषेखालील असावा.
 • विधवा किंवा परितक्त्यांना प्राधान्य देऊन या योजनेचा लाभ दिला जात आहे.
 • खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीवर अतिक्रमण झालेले नसावे.
 • सदरील जमीन मशागती योग्य असावी.
 • महाराष्ट्रातील फक्त भूमिहीन Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojanaचा लाभ मिळणार आहे.
 • कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राबाहेरील भूमिहीन मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • सदरील योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्रातील अनुसूचीत जाती किंवा नवबौद्ध वर्गातील असावा.
 • लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्षदरम्यान असणे गरजेचे आहे.
 • राज्यातील विधवा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाते.
 • लाभार्थी कुटुंबाला Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojanaअंतर्गत मिळालेली शेतजमीन कोणत्याही कारणास्तव विकता अथवा भाडेतत्वावर देता येणार नाही.
 • लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत मिळालेली जमीनीवर स्वतः शेती करने बंधनकारक असून तसा करारनामा देणे अनिवार्य आहे.
 • सदरील योजनेच्या लाभार्थी कुटुंबाला मिळणारे बिनव्याजी कर्ज हे 10 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. लाभार्थ्याने 10 वर्षाच्या आत त्या कर्जाची परतफेड करणे अनिवार्य आहे.
 • महसूल व वनविभागातर्फे ज्या लाभार्थी कुटुंबांना गायरान आणि सायलिंग जमिनी मिळाल्या आहेत, त्या कुटुंबांना Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana योजनेचा लाभ मिळणार नाही.

भूमिहीन लाभार्थीला किती शेती मिळते?

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojanaच्या माध्यमातून पात्र लाभार्थी व्यक्तींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेत जमीन उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये मात्र पात्र शेतकरी वर्ग अगदी व्यवस्थितरीत्या त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पार पाडतील.

अर्ज कोठे करायचा?

तुम्ही जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल आणि या योजनेच्या अटी व पात्रतेनुसार पात्र ठरत असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज तुम्हाला सहाय्यक समाज कल्याण अधिकारी कार्यालयांमध्ये जाऊन सादर करावा लागेल.

१५ वर्षांपासून योजना राबविण्यात अडचणी

या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यावयाचा असेल तर प्रशासनाने ठरवलेल्या रेडिरेकनर दरानुसार जमीन खरेदी केली जात आहे. परंतु जमिनीची विक्री करणाऱ्या शेतकरी वर्गाला प्रशासनाचा हा जो काही दर आहे तो अजिबात परवडत नाही, ही एक मोठी अडचण आतापर्यंत येत होती.

आतापर्यन्त राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती नगरीकांनी या योजनेचा लाभ घेतला जे जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment