Subsidy On Solar Panels: सोलार पंप बसविण्यासाठी 90 % सबसिडी कशी मिळवायची? जाणून घ्या…

Subsidy On Solar Panels : भारतातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून तर रहावेच लागते, पण त्यासोबतच पावसाचे पाणी विहिरीत, शेततळ्यात साठवून ठेवल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना मोटार चालू करण्यासाठी विजेवर अवलंबून रहावे लागते. मात्र अनेकदा लोड शेडिंगमुळे विज बंद करण्यात येते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी पुरवठा करता येत नसल्यामुळे उत्पादन देखील घटत आहे. त्यासाठीच राज्य शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये सोलर पंप बसविण्यासाठी सोलार पंपावर अनुदान देण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना सुरू केली आहे. कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून अनुदान कसे मिळवायचे संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या या लेखातून घेणार आहोत.

Subsidy On Solar Panels
Subsidy On Solar Panels
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Subsidy On Solar Panels 2024

भारत सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीचा पुरवठा करणे सोपे आणि व्हावे याकरिता प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना दिनांक 19 फेब्रुवारी 2019 पासून सुरु केली आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेमार्फत शेतकऱ्यांना सोलार पंपाचा लाभ मिळवायचा असेल तर ते अगदी सहज आणि अत्यंत कमी खर्चात मिळविणे शक्य आहे. या योजने अंतर्गत भारत सरकारकडून पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देत (Subsidy On Solar Panels) असेल तरी सुद्धा 10% रक्कम ही या योजनेच्या लाभार्थ्याला स्वतच्या पदरातून खर्च करावी लागते.

डिझेल पंप घेण्यासाठी मिळणार 90% अनुदान

सरकार तर्फे किती अनुदान मिळते?

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून भरतातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सोलार पंप बसविलेले आहेत. अगोदर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या क्षमतेचे सोलार पॅनल आणि पंप बसविण्यासाठी कमी पैसे मिळत होते, मात्र आता शासनाने या रकमेत वाढ केली असून शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.

  • 1KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 14588/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 18000/- अनुदान मिळते.
  • 2KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 29176/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 36000/- अनुदान मिळते.
  • 3KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 43764/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 54000/- अनुदान मिळते.
  • 4KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 51058/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 63000/- अनुदान मिळते.
  • 5KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 58352/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 72000/- अनुदान मिळते.
  • 6KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 65642/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 81000/- अनुदान मिळते.
  • 7KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 72940/- रु, अनुदान मिळत होते, मात्र आता 90000/- अनुदान मिळते.
  • 8KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 80234/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 99000/- अनुदान मिळते.
  • 9KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 87528/- रु. अनुदान मिळत होते, मात्र आता 108000/- अनुदान मिळते.
  • 10KW क्षमतेच्या पंपासाठी आधी 94822/- रु. . अनुदान मिळत होते, मात्र आता 117000/- अनुदान मिळते.

पीएम कुसुम सोलार योजनेची अंतिम मुदत

पीएम कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून आता शेतकऱ्यांना त्यांच्या नापीक, पडीक जमीन, कुरण आणि पाणथळ जमिनीवर सुद्धा सौर ऊर्जेचे प्रकल्प बसवता येणे शक्य झाले आहे.

Subsidy On Solar Panels चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड
  • नोंदणीची प्रत
  • बँक खात्याचा तपशील
  • जमिनीची कागदपत्रे
  • सातबारा उतारा,
  • उतारा 8अ
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर

पीएम कुसुम सोलार योजने अंतर्गत Subsidy On Solar Panelsसाठी असा करा अर्ज

  • प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत Subsidy On Solar Panels चे लाभार्थी होण्यासाठी सर्वप्रथम या योजनेशी निगडीत अधिकृत pmkusum.mnre.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तेथे लॉग इन करणे आवश्यक आहे.
  • लॉग इन केल्यावर ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्या फॉर्ममध्ये अर्जदार शेतकऱ्याने त्याची सर्व माहिती भरा
  • आता तुमची डिजिटल स्वाक्षरी आणि तुमचा फोटो अपलोड करा.
  • अर्जात भरलेली सर्व भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून अर्ज सबमीट करा.
  • या योजने संबंधित अधिकारी तुमचा फॉर्म तपासून 30 दिवसांच्या आत तुमच्या शेतात Subsidy On Solar Panels अंतर्गत पॅनल बसवले जातील.

Leave a Comment