रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल? लाभ मिळवण्यासाठी Ration Card Update करणे अनिवार्य, Online Process जाणून घ्या

देशात काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी LPG सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत. अशातच एका रिपोर्टनुसार स्वयंपाकासाठी पर्यायी उपाय म्हणून सुमारे 48 हजार लिटर रॉकेलची व्यवस्था केल्याचा दावा केंद्र सरकारने केल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे काही भागात पुन्हा केरोसिनचा वापर वाढू शकतो आणि अनेकांना घरात ठेवलेले केरोसिन स्टोव्ह पुन्हा वापरावे लागू शकतात. जर रेशन दुकानातून केरोसिन खरेदी करायचे असेल तर तुमचे Ration Card Update असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना Ration Card Update कसे करायचे हा प्रश्न पडतो. चला तर मग Online Process समजून घेऊया.

Ration Card Online Update करण्याची Process

  • सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in वर जा.
  • होमपेजवर गेल्यानंतर Online Services या विभागावर क्लिक करा.
  • यानंतर जर तुमचे आधी खाते नसेल तर New User Registration करून नवीन Account तयार करा.
  • Login केल्यानंतर तुमच्या Ration Card ची माहिती दिसेल.
  • यानंतर Aadhaar Seeding किंवा KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे Aadhaar Number Ration Card शी लिंक करावे लागतात.
  • जर तुम्हाला माहितीमध्ये बदल करायचा असेल तर Modification Form भरावा लागतो. या फॉर्ममध्ये पुढील बदल करता येतात
    • कुटुंबातील सदस्याचे नाव वाढवणे
    • सदस्याचे नाव कमी करणे
    • पत्ता बदलणे
    • इतर वैयक्तिक माहिती अपडेट करणे
  • फॉर्म भरल्यानंतर आवश्यक Documents Upload करावे लागतात. यामध्ये साधारणपणे पुढील कागदपत्रांची गरज पडते
    • Aadhaar Card
    • Income Certificate
    • Address Proof

सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज Submit करा. अर्ज Submit केल्यानंतर तुम्हाला एक Receipt किंवा Application Slip मिळते. ही Slip जतन करून ठेवा. नंतर आवश्यक असल्यास जवळच्या तहसील कार्यालयात Verification साठी जावे लागू शकते.

UMANG App वरून Ration Card Update करण्याची Process

  • जर तुम्हाला मोबाईलवरूनच प्रक्रिया करायची असेल तर UMANG App चा वापर करू शकता.
  • सर्वप्रथम Play Store किंवा App Store मधून UMANG App Download करा.
  • यानंतर Mobile Number वापरून Register करा आणि MPIN सेट करा.
  • App उघडल्यानंतर Search Bar मध्ये Mera Ration किंवा Department of Food and Public Distribution असे Search करा.
  • यानंतर तुमचे State म्हणजे Maharashtra निवडा.
  • त्यानंतर Food and Civil Supplies Department संबंधित Services दिसतील.
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील
    • View Ration Card Details
    • Update Ration Card
    • Check Aadhaar Seeding Status

जर माहिती बदलायची असेल तर Update Ration Card किंवा Modification पर्याय निवडा.

यानंतर तुमचा Ration Card Number टाका आणि आवश्यक माहिती भरा. ज्या सदस्याचे नाव वाढवायचे आहे किंवा माहिती बदलायची आहे ती भरावी लागते.

त्यानंतर आवश्यक Documents जसे Aadhaar Card किंवा Income Proof यांचे Photo किंवा PDF Upload करा.

सर्व माहिती भरल्यानंतर Submit करा. Submit केल्यानंतर तुम्हाला Application ID मिळेल. या Application ID च्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची Status Tracking करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या Online पद्धतीने Ration Card Update करू शकता आणि भविष्यात रेशन दुकानातून केरोसिन किंवा इतर धान्य घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment