LIC plan | फक्त एका गुंतवणुकीवर मिळवा एक लाखापर्यंत ची पेन्शन, एलआयसीची ही एक उत्तम पॉलिसी योजना;

LIC new Jeevan Shanti plan | एलआयसी कंपनी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे व याच्या मध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फक्त एकच नव्हे तर अनेक अशा उत्तम योजना आहेत. त्यापैकीच एलआयसी यांच्याकडून दिलेल्या सेवानिवृत्त योजना ह्या खूप लोकप्रिय आहेत (lic jeevan shanti pension plan). त्यामध्ये त्यांनी एलआयसी ची नवीन योजना म्हणजे जीवन शांती योजना ही सुरू केलेली आहे. ही एक प्रीमियम योजना असून यामध्ये तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीमध्ये दरवर्षी 50 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.

एलआयसीची ही पॉलिसी मिळवण्याकरिता वयोमर्यादेची देखील अट आहे त्यामध्ये अर्जदाराचे वय हे 30 ते 79 पर्यंत सुनिश्चित करण्यात आले आहे. या एलआयसीच्या योजनेकरिता किंवा तुम्हाला ही योजना खरेदी करायची असेल तर यासाठी कंपनी तुम्हाला दोन पर्याय देतात (lic jeevan shanti plan calculator). पहिला प्लॅन म्हणजे एकच जीवनासाठी स्थगित वार्षिकी आहे व दुसरा म्हणजे संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या एका योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

एलआयसी ची नवीन आलेली योजना म्हणजेच जीवन शांती योजना ही एक वार्षिक योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची पेन्शनची मर्यादा निश्चित करू शकता. तुमच्या निवृत्तीनंतरही तुम्हाला आयुष्यभर पेन्शनची काळजी करण्याची गरज नाही. या योजनेनुसार जर एखादा व्यक्ती 55 वर्षाचा असेल आणि त्याने हा प्लॅन खरेदी करताना ११ लाख रुपये जमा केले आणि ही रक्कम त्याने पाच वर्षासाठी ठेवली तर त्याला ह्या एका गुंतवणुकीवर वार्षिक १,०१,८८० रुपये व याहूनही अधिक पेन्शन मिळू शकेल (lic jeevan shanti interest rate). तसेच त्या व्यक्तीस सहा महिन्याच्या आधारावर ४९,९९१ रुपये आणि मासिक आधारावरती ८१४९ रुपये मिळतील.

यामध्ये विशेष बाब म्हणजे नवीन जीवन शांती योजने करिता एलआयसीचे वार्षिक दर देखील वाढवलेले आहेत. एलआयसी ने 5 जानेवारी 2023 पासून वार्षिक दरामध्ये भर घातलेली आहे. यामध्ये कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही हा प्लॅन कधीही सरेंडर करू शकता. तुम्ही या योजनेमध्ये किमान दीड लाख रुपये गुंतवू शकता व यासाठी कोणतीही कमाल मर्यादा ठेवली गेलेली नाही म्हणजेच तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. कालावधीमध्ये जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या खात्यात केलेली संपूर्ण रक्कम ही त्याच्या नॉमिनीला दिली जाते.

Leave a Comment