Cotton market rate कापसाच्या दरामध्ये झाली 300 ते 500 रुपयांनी वाढ!

गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये कापसाच्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी निराश झाले होते. दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका तरी दर मिळावा अशी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी कापूस न विकता तो घरातच ठेवून बाजार भाव कधी वाढेल याची वाट पाहत होते. परंतु कापूस 8000 या रकमेच्या पुढे गेलाच नाही. यंदाच्या खरीप हंगामात कापसाची नवीन लागवड झालेली असून दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्येच नवीन कापूस तोडायला आलेला आहे.

कापसाच्या दराला मिळत आहे एक चांगला आधार

सध्या देशांतर्गत बाजारातील कापूस या पिकाची दराचे स्थिती पाहिली असता गेल्या दोन ते तीन दिवसात यामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आलेले आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी आल्यामुळे कापसाच्या दरामध्ये सध्या सुधारणा दिसत आहे.

cotton rate

गेल्या वर्षी कापसाची लागवड ही 121 लाख हेक्टर होती व त्याच्या तुलनेस ह्या वर्षी 119 लाख हेक्टर इतकी झाली आहे. जर महाराष्ट्रातील कापूस उत्पादन भाग पहिला तर त्या ठिकाणी देखील पाऊस यावर्षी कमी झाला आहे. यावर्षीच्या हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पाऊस हा कमी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

cotton rate maharashtra

या सगळ्या बदलत्या हवामानाचा व पावसाच्या परिस्थितीचा कापूस या पिकावर परिणाम देखील होऊ शकतो. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये अनेक सण येणार आहेत त्यामुळे त्या दिवसात कपड्यांना देखील खूप प्रमाणात मागणी वाढणार आहे. आणि हे सुद्धा साहजिकच आहे की कपड्यांना मागणी वाढली की कापसाला देखील मागणी वाढणार. या सर्व कारणांमुळे देखील आता कापसाच्या दरामध्ये वाढ होत असताना दिसून येत आहे व ती पुढील काळात टिकेल अशी दाट शक्यता देखील आहे.

या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसापासून कापसाच्या दरामध्ये प्रतिक्विंटल 300 ते 500 रुपये इतकी वाढ झालेली दिसून आली आहे.
सर्वसाधारणपणे सध्याच्या काळात कापसाचे दर हे साडेसात हजार ते साडेदहा हजार प्रतिक्विंटल इतक्या दरम्यान होते. यामध्ये या दराचा चालू महिन्यात चढ-उतार होऊ शकतो परंतु हा दर जास्तीत जास्त टिकण्याची शक्यता देखील आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये कापसाच्या दराला चांगला आधार मिळण्याची शक्यता काही तज्ञांनी व या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलेले आहेत.

Leave a Comment