लाडकी बहीण योजनेसाठी eKYC अशी करा मोबाईलवरून – Ladki Bahin Scheme eKYC

महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’ (Maharashtra Ladki Bahin online) अंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थीने eKYC (Electronic Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक महिलांना प्रश्न पडतो की eKYC कशी करायची आणि ती मोबाईलवरून करता येते का? होय, ही प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून करता (mobile eKYC Maharashtra) येते. खाली दिलेली माहिती त्या संदर्भात उपयुक्त ठरेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Scheme eKYC करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया

  • स्टेप पहिली : अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
    • सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये www.ladakibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उघडा. हे संकेतस्थळ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल आहे. होमपेज उघडल्यानंतर पुढे जाण्यासाठी ‘eKYC प्रक्रिया’ हा पर्याय निवडा.
  • स्टेप दुसरी : eKYC टॅब निवडणे
    मुख्यपृष्ठावर तुम्हाला ‘लाडकी बहीण योजनेसाठी eKYC प्रक्रिया’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. हीच लिंक पुढील पडताळणीसाठी आवश्यक आहे.
  • स्टेप तिसरी: लाभार्थी महिलेची आधार पडताळणी
    या टप्प्यात तुमचा (लाभार्थी महिलेचा) आधार क्रमांक टाकून पडताळणी करावी लागते. (Ladki Bahin Scheme Aadhaar verification)
    • दिलेल्या जागेत तुमचा १२ अंकी आधार क्रमांक भरा.
    • खाली दिसणारा कॅप्चा कोड योग्य प्रकारे लिहा.
    • ‘मी सहमत आहे’ या बॉक्सवर क्लिक करून ‘ओटीपी पाठवा’ हा पर्याय निवडा.
    • आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला OTP दिलेल्या जागेत टाकून पडताळणी पूर्ण करा.
  • स्टेप चौथी: पती अथवा वडिलांची आधार पडताळणी
    आता तुम्हाला कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचा आधार क्रमांक द्यावा लागेल.
    • विवाहित महिलांनी आपल्या पतीचा आधार क्रमांक द्यावा.
    • अविवाहित, घटस्फोटित अथवा विधवा महिलांनी आपल्या वडिलांचा आधार क्रमांक द्यावा.
    • यानंतर कॅप्चा भरून ‘ओटीपी पाठवा’ निवडा आणि आलेला ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करा.
  • स्टेप पाचवी : जात प्रवर्ग आणि घोषणांची पूर्तता
    पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जात प्रवर्ग निवडणे आणि अटींशी सहमती दर्शवणे आवश्यक आहे.
    • ड्रॉप-डाऊन यादीतून तुमचा जात प्रवर्ग (SC, ST, OBC, Open इ.) निवडा.
    • खाली दिलेल्या घोषणांमध्ये योग्य पर्याय निवडा, जसे की –
      • “कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नोकरीवर नाही.”
      • “कुटुंबातील फक्त एक किंवा दोनच महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.”
    • शेवटी, दिलेल्या घोषणा बॉक्सला टिक करून अटींशी सहमती द्या.
    • ‘सबमिट’ किंवा ‘स्थापित करा’ या बटनावर क्लिक करून eKYC प्रक्रिया पूर्ण करा.

लाडकी बहीण योजनेच्या eKYC संदर्भातील महत्वाच्या सूचना

  • eKYC करताना लाभार्थीचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • इंटरनेट कनेक्शन स्थिर ठेवा, अन्यथा पडताळणीमध्ये अडचण येऊ शकते.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर पुष्टी संदेश (Confirmation Message) दिसेल, तो सुरक्षित ठेवा. (Ladki Bahin Scheme 2025)

Leave a Comment