Diesel Pump Subsidy : शेतकऱ्यांनो खुशखबर..!! डिझेल पंपावर मिळणार 90% सरकारी अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज!

Diesel Pump Subsidy : सरकार द्वारे देशातील सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल जात असल्याचं दिसून येत आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सिंचन साधनांवर अनुदानही दिले जात आहे. यामध्ये सौर पंप, त्यासोबतच इलेक्ट्रिक आणि डिझेलवर चालणारे पंप संच यांचा सुद्धा समावेश केला गेला आहे. या संदर्भामधेच शेतकऱ्यांना अनुदानावर, मध्य प्रदेश सरकारद्वारे डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप संच देण्याचे लक्ष्य म्हणजेच उद्दिष्ट ठेवले गेले आहे. शेतकरी सध्या सुरू असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Diesel Pump Subsidy
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र सरकारद्वारे सुद्धा ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा अद्याप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नाही. आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातही लवकरच हा निर्णय लागू करण्यात येऊ शकतो. कृषी मंत्रालयाने विविध योजनांतर्गत 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना अनुदानित (Diesel Pump Subsidy) पंप संच (डिझेल/इलेक्ट्रिक) पुरविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.

How much subsidy will be given on Diesel Pump?

शेतकऱ्यांना, शेतकरी वर्ग आणि जमीन धारण करणाऱ्या वर्गवारीनुसार वेगवेगळ्या योजनांतर्गत डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप सांचावर वेगवेगळी सबसिडी (Diesel Pump Subsidy) देण्यात येते, आणि ही सबसिडी 90 टक्क्यांपर्यंत देण्यात येत आहे. याठिकाणी, ज्या शेतकऱ्यांना सिंचन यंत्रे खरेदी करण्याची इच्छा आहे, ते डिझेल पंप अनुदानाच्या किंमतीनुसार उपलब्ध असलेली सबसिडी, ई-कृषी यंत्र या सबसिडी पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या कॅल्क्युलेटर वर तपासू शकतात.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

लॉटरीमधे निवड झाल्यानंतर, अर्ज करताना आणि जेव्हा अधिकारी अर्जाची पडताळणी करत असतील तेव्हा शेतकऱ्यांना काही कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत. ही आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी
  • आधार कार्डची कॉपी
  • सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले जात प्रमाणपत्र (फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी),
  • B-1 ची कॉपी,
  • वीज कनेक्शन प्रमाणपत्र (जसे की वीज बिल)

अनुदानित पंप संचासाठी अर्ज कोठे करावा? | Where to apply for Diesel Pump Subsidy?

  • शेतकऱ्यांना डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप संचावरील अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची गरज असणार आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक असणारे शेतकरी ई-कृषी यंत्र सबसिडी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
  • पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केलेली असेल असे शेतकरी आधार ओटीपीद्वारे देखील लॉग इन करून अर्ज सबमिट करू शकणार आहेत.
  • नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
  • पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळच्या एमपी किंवा सीएससी केंद्राला भेट देऊन शेतकरी ऑनलाइन प्रकारे अर्ज करू शकणार आहेत.
  • या योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी पोर्टलला भेट द्या.
  • तुम्ही तुमच्या ब्लॉक किंवा जिल्ह्याच्या कृषी विभाग कार्यालयासोबत संपर्क साधा.

Leave a Comment