chandan sheti | 1 एकर शेतीतून व्हा करोडपती! अशा प्रकारे करा चंदनाची फायदेशीर शेती; या चंदनाचे लाकूड 25 हजार रु प्रति किलो;

chandan sheti mahiti : भारतातील बहुतांश शेतकरी पारंपारिक पीक पद्धतींचा अवलंब करण्यावर प्राधान्य देतात. प्रामुख्याने भारतात गहू, मका, हरभरा या सोबतच इतर कडधान्य या पिकांची लागवड करून शेतकरी आपली आर्थिक स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे अधून मधून आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळते. अशावेळी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कुमकुवत होत. अशावेळी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे आहे. इतर अनेक शेतीचे प्रकार आहेत ज्या माध्यमातून शेतकरी त्यांची आर्थिक स्थिती सहजपणे साधू शकतील.

chandan sheti mahiti in marathi : शेतीमध्ये जर विविध आधुनिक शाश्वत पद्धतींचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच पांढऱ्या चंदनाच्या शेतीकडे वळू शकता आणि ह्या शेतीतून तुम्ही तुमचे नशीब अगदी सहजपणे उजळवू शकता. विशेष बाब सांगायची झाली भारतातील जवळपास सर्वच ठिकाणी योग्य नियोजनाच्या जोरावर तुम्ही पांढऱ्या चंदनाची लागवड सहजपणे करू शकता. चंदनाच्या लागवडीसाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेलच. परंतु पिकाचा कालावधी पूर्ण होताच तुम्हाला नफाच नफा प्राप्त होईल.

महाराष्ट्रात चंदनाची शेती कायदेशीर आहे का?

पांढऱ्या चंदनाविषयी सांगायचे झाले तर हे चंदन खूपच महाग आहे. त्यामुळे ह्याला विक्री करत असताना चांगला दर मिळू शकतो. हे ऐकून तुम्ही थक्कच व्हाल एक किलो पांढऱ्या चंदनाच्या लाकडाची किंमत ही 25 ते 30 हजार रुपये इतकी आहे. चंदनाच्या एकाच झाडाच्या विक्रीतून शेतकरी लाखो रुपयांची कमाई करू शकतात. परंतु ही शेती करायची असेल तर शेतकऱ्यांकडे संयम असणे गरजेचे आहे. कारण चंदनाच्या झाडाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दहा वर्षे जास्तीत जास्त बारा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. भारतीय संस्कृतीमध्ये पांढरा चंदनाला अतिशय पवित्र मानले जात असून याचा उपयोग पूजेत केला जातो. यासोबतच विविध सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी ही याचा उपयोग होतो.

शेतीसाठी कोणते चंदन उत्तम आहे?

संपूर्ण भारत देशात तुम्ही चंदनाची लागवड करू शकता. चंदनाची लागवड करत असताना जमिनीचा पीएच कमीत कमी 6 जास्तीत जास्त 8.5 इतका असावा. ज्या शेतामध्ये आपण चंदनाची रोपे लावणार आहोत त्या शेतामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. यासोबतच बर्फ वृष्टी पासून चंदनाच्या प्लॉटचे संरक्षण करावे. अशा परिस्थितीमध्ये सांगायचे झाले तर बर्फाळ प्रदेशामध्ये आपण चंदनाची शेती योग्यरित्या अजिबात करू शकत नाही…

चंदन वाढण्यास किती वेळ लागतो?

एक एकरामध्ये चंदनाची शेती करायची असेल तर 400 पांढरा चंदनाची झाडे सहजपणे आपण लावू शकतो. झाडांमधील अंतर हे चारी बाजूंनी 12 फूट इतके असावे. जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर शेतकरी चंदनाच्या शेतीमध्ये अंतर पीक घेऊन अधिकचा नफा मिळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाजीपाल्याचे शेती त्या ठिकाणी करू शकता. चंदनाच्या शेतीसाठी खताचा व औषधाचा खर्च प्रत्येक वर्षी 25 ते 30 हजार रुपये इतका होतो. अशा प्रकारे तुम्ही दहा ते बारा वर्षे चंदनाच्या झाडांची जोपासना केली तर नक्कीच तुम्ही बारा वर्षात करोडपती होऊ शकता…

Leave a Comment