Land Record 2024: नमस्कार शेतकरी मित्रानो, आजच्या या लेखात आपण जमिनीच्या आधार कार्ड बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI तर्फे जमीन मालकांना त्यांच्या जमिनीसाठी आधार क्रमांक देण्याकरिता एक योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला “जमिनीसाठी आधार” (jaminiche adhar) असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत जमीन मालकांना त्यांचा आधार नंबर त्यांच्या जमिनीच्या नोंदीबरोबर लिंक करता येणार आहे. यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्री बाबत होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होणार असून, जमीनिच्या मालकांना सरकारी योजनांचा लाभ घेणे अत्यंत सुलभ आणि सोपे होणार आहे. Land Record 2024
भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर मोदी सरकारने भारत डिजिटल करण्यावर सर्वाधिक भर दिला असून, सरकारी कार्यालयामधील कामापासून देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत हे डीजिटायलजेशन पोहोचवण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. या डीजिटायलजेशन अनंतर्गत भारतातल्या नागरिकांना देण्यात दीलेल्या आधार कार्ड द्वारे त्यांना मोठा फायदा झाला असून याच पार्श्वभूमीवर आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकार प्रत्येक नागरिकांच्या जमिनीलाही आधार क्रमांक जारी करण्याच्या तयारीत आहे.
या Land Record 2024चा काय होईल फायदा?
डिजिटली झालेल्या जमिनीच्या नोंदीमुळे लोकांना सेंट्रल ऑफ रेकॉर्ड्स, कन्व्हिनियन्स ऑफ रेकॉर्ड्स, रेकॉर्ड्सचे संकलनचा खूप फायदा होईल. याअंतर्गत, तुमच्या मालकीच्या जमिनीला 14 अंकी ULPIN क्रमांक देण्यात येणार आहे. आणि या क्रमांकालाच जमिनीचा आधार क्रमांकही (jaminiche adhar) म्हणता येईल. याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या एका क्लिकवर तुमच्या जमिनीची सर्व कागदपत्रे व इतर काही माहिती सुद्धा पाहू शकाल.
जमिनीसाठी आधार क्रमांक मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
- सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या UIDAI केंद्राला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला नाव-नोंदणीचा फॉर्म भरायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या मालकीच्या जमिनीच्या नोंदी तिथे उपस्थित नोंदणी अधिकाऱ्याजवळ द्या.
- पुढे तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती द्यावी लागेल जसं की फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅन.
- सगळ्यात शेवटी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे.
तुमचा अर्ज सबमिट केल्यावर संपूर्ण शहानिशा केल्यावर 15 दिवसांच्या आत आधार पत्र पोस्टाने पाठवण्यात येईल.
jaminiche adhar संबंधीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार
ULPIN क्रमांक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी बरोबरच अनेक योजनांत वापरला जाऊ शकतो. ULPIN क्रमांकाच्या सहाय्याने तुम्हाला भारतातल्या कोणत्याही ठिकाणी जमीनीची खरेदी-विक्री करताना कसलीही अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात जर जमिनीचे विभाजन झाले तर त्या दोन्ही जमिनींचा आधार क्रमांक हा वेगळा असणार आहे.