Hsrp Number Plate म्हणजे काय, ती का आवश्यक आहे, महाराष्ट्रातील अंतिम मुदत काय आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आणि जर नंबर प्लेट बसवली नाही तर किती दंड भरावा लागू शकतो – ही सर्व माहिती या लेखात मिळेल.
Hsrp Number Plate म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही सरकारमान्य विशेष नंबर प्लेट आहे, जी वाहन सुरक्षा वाढवण्यासाठी आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी वापरण्यात येते.
Hsrp Number Plate ची वैशिष्ट्ये
- ब्ल्यू क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम, ज्यामुळे बनावट प्लेट सहज ओळखता येते
- यूनिक 10-अंकी लेसर-ब्रँडेड क्रमांक, जो नक्कल करणे अशक्य आहे
- हॉट-स्टॅम्प फिल्म, जी नंबर प्लेटवरील अक्षरांना सुरक्षित ठेवते
- IND चिन्ह, जे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ब्ल्यू रंगात छापलेले असते
- टॅम्पर-प्रूफ लॉकिंग सिस्टम, ज्यामुळे नंबर प्लेट सहज काढता येत नाही
Hsrp Number Plate कोणत्या वाहनांसाठी बंधनकारक आहे
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी hsrp number plate बसवणे अनिवार्य आहे.
Hsrp Number Plate आवश्यक असलेली वाहने
- दुचाकी – बाईक, स्कूटर, मॉपेड, स्पोर्ट्स बाईक, क्रूझर बाईक, ऑफ-रोड बाईक, टूरिंग बाईक, ॲडडव्हेंचर बाईक, कॅफे रेसर, इलेक्ट्रिक बाईक, हायब्रिड बाईक, डर्ट बाईक.
- चारचाकी – कार, SUV, जीप, सेडान, हॅचबॅक, SUV, MPV, कूपे, कन्व्हर्टिबल, लक्झरी कार, स्पोर्ट्स कार, पिकअप ट्रक, मिनीव्हॅन, क्रॉसओवर, इलेक्ट्रिक कार, हायब्रिड कार, ऑफ-रोड वाहन, लिमोझिन.
- व्यावसायिक वाहने – ट्रक, ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, मिनी ट्रक, ट्रॅव्हलर, ट्रॅक्टर, डंपर, टँकर, कंटेनर ट्रक, पिकअप व्हॅन, लॉरी, रिक्षा, क्रेन, फोर्कलिफ्ट, अग्निशमन वाहन.
Hsrp Number Plate बसवण्याची गरज नसलेली वाहने
1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांना नवीन नंबर प्लेट आधीपासूनच दिली जाते, त्यामुळे त्यांना HSRP NUMBER PLATE बसवण्याची गरज नाही.
Hsrp Number Plate बसवण्याची अंतिम मुदत
महाराष्ट्र परिवहन विभागाने hsrp number plate बसवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 निश्चित केली आहे.
Hsrp Number Plate न लावल्यास किती दंड?
जर 30 एप्रिल 2025 नंतर वाहनावर Hsrp Number Plate नसेल, तर 10000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
Hsrp Number Plate बनवण्याची ऑनलाईन प्रक्रिया
- महाराष्ट्राच्या HSRP नंबर प्लेटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- तुमचे RTO office चे नंबर निवडा जसे की छ. संभाजीनगर असेल तर MH20 निवडा
- त्यानंतर सबमिट करून Aplly HSRP पर्याय निवडा.
- त्यानंतर वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करा
- नंतर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा
- नंतर पेमेंट करून पावती डाउनलोड करा
- 15 दिवसांत Hsrp Number Plate तयार होईल आणि सूचनेनंतर ती तुमच्या वाहनावर बसवता येईल
Hsrp Number Plate बनवण्याची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- तुमच्या जवळच्या RTO किंवा अधिकृत डीलरशिपला भेट द्या
- आवश्यक कागदपत्रे द्या – जसे की, RC बुक, ड्रायव्हिंग लायसन्स, पत्ता पुरावा
- अर्ज भरून शुल्क जमा करा
- काही दिवसांत तुमची Hsrp Number Plate तयार होईल
Hsrp Number Plate ची किंमत किती आहे?
- दुचाकी – 450 रुपये (GST अतिरिक्त)
- तीनचाकी – 500 रुपये (GST अतिरिक्त)
- चारचाकी – 745 रुपये (GST अतिरिक्त)
- व्यावसायिक वाहन – 745 रुपये (GST अतिरिक्त)
Hsrp Number Plate का आवश्यक आहे
- वाहन चोरी रोखण्यासाठी – ही नंबर प्लेट एकदाच बसवली जाते, त्यामुळे चोरी करून ती बदलणे शक्य नाही
- बनावट नंबर प्लेट टाळण्यासाठी – जुने नंबर प्लेट्स सहज बदलता येत असल्याने फसवणुकीच्या घटना घडत होत्या
- वाहन सुरक्षा वाढवण्यासाठी – प्रत्येक वाहनाची माहिती डिजिटल रजिस्ट्रेशन सिस्टममध्ये संग्रहित केली जाते
निष्कर्ष
महाराष्ट्रातील सर्व वाहनचालकांनी 30 एप्रिल 2025 पूर्वी त्यांच्या वाहनांवर hsrp number plate बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर hsrp number plate बसवा आणि सुरक्षित राहा.