7 proof of Land record: जमिनीवर तुमची मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का?

7 proof of Land record : जमीनीचा तुमची मालकी हक्क हा अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा असतो, कारण आपण राहत असलेली किंवा आपण शेत करत असलेली जमिनिवर आपली मालकी हक्क सांगणारे कागदपत्र नसेल तर आपण त्यावर हक्क सांगूच शकत नाही, किंवा त्यावर शेती करु शकत नाही अथवा त्यावर घर बनवू शकत नाही. म्हणूनच अश्या वेळी आपल्याला त्या जमिनीवर स्वतःचा मालकी आणि हक्क आहे हे सिद्ध करावे लागतो. ग्रामिण भागात किंवा शहरी भागात सुद्धा स्वतःच्या मालमत्तेवर हक्क सिद्ध करण्याकरिता काही पुरावे द्यावे लागतात. म्हणूनच आम्ही कोणत्याही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करण्याकरिता कोण-कोणते कागदपत्रे सादर करावे लागतात याची संपूर्ण माहिती देणार आहोत. या लेखाच्या मध्यमातून जाणून घ्या कि ते कोणते 7 पुरावे आहे ज्या द्वारे त्या जमिनीवर तुमची मालकी हक्क सिद्ध होईल

7 proof of Land record
7 proof of Land record
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

7 proof of Land record

1. जमिनीचे खरेदी खत : Kharedi Khat

जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करता वेळी बनवले जाणारे सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे खरेदी खत हे होय. खरेदी खताला तुम्ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीचा प्रथम पुरावा सुद्धा म्हणू शकता. यामुळे जमिनीचा व्यवहार कोणत्या तारखेलाआणि कोणा-कोणात झाला, या शिवाय सदरील जमिनीचा व्यवहार किती रुपयांत झाला याबाबतची संपूर्ण माहिती स्पष्टपणे नमूद केलेली असते. 7 proof of Land record

2. सातबारा उतारा : Satbara Utara (7/12)

सातबारा अथवा 7/12 उतारा हा प्रत्येकाच्या जमिनीच्या नोंदीशी संबंधीत एक महत्वाचे से कागदपत्र आहे. सातबारा उताऱ्याला तुमच्या जमिनीच्या मालकीचा पुरावा सुद्धा म्हणतात. शेतजमिनीकरिता, 7/12 उतारा हा एक महत्वाचा आणि आवश्यक असा कृषी तपशील असतो. सातबाऱ्यात घेतलेल्या पिकांचे प्रकार, लागवडीखालील एकूण जमिनीची व्याप्ती बरोबरच सिंचन स्त्रोतांचे संपूर्ण तपशील या सर्व गोष्टींची माहितीदेखील या उताऱ्यात प्रविष्ट केलेली असते. या बरोबरच जमिनीच्या मालकासंबंधीत संपूर्ण माहिती जसे कि, संबंधित जमिन कोणाकडून घेतली किंवा विकली? या संदर्भातील माहिती सुद्धा सातबारा उतारामध्ये नमूद केली जाते. त्यामुळे एखाद्या जमीनीचे खरेदीदार आणि विक्रीदार कोण होते ते सर्व याच कागदपत्रातून समजते. 7 proof of Land record

3. जमिनीचा 8 -अ उतारा

जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांत विभागली गेलेली असते. त्या सर्व गटक्रमांकांची एकत्रीपणे माहिती असलेले महत्वाचे कागदपत्र म्हणजेच 8-अ प्रमाणपत्र होय. या 8–अ उताऱ्यात गावातील तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात विभागलेली आहे हे स्पष्ठपणे समजते. एखाद्या जमिनीवरील तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 8–अ उतारा एक महत्वाचा पुरावा म्हणून वापरता येतो. 7 proof of Land record

4. जमीन मोजणीचे नकाशे : land map

शेतजमीन असो किंवा शेतजमीन नसो म्हणजेच कोणतीही जमिनीची मोजनी करण्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घेण्यात येते. जमिनीच्या मालकी हक्काप्रमाणे त्याचे नकाशे सुद्धा बनविण्यात येतात. सध्याच्या काळात डिजिटलायझेशन पद्धतीमुळे शासनाने अधिकृत नोंदणी असलेल्या सर्व जमिनीचे नकाशे ऑनलाईन प्रसिद्ध केलेले आहेत. डिजिटलायझेशनमुळे आता कोणीही कोणात्याही जमिनीचा नकाशा अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने त्याच्या मोबाईलवर डाउनलोड करने सहज शक्य झाले आहे. तुम्ही देखील तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन मिळवून तुमच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून वापरु शकता. जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा डाउनलोड करावा हे जाणून घेण्यासाठी https://abdnews.in/download-free-land-map-in-all-viiiages-land/ या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. 7 proof of Land record

5. जमीनिच्या महसूल भरलेल्या पावत्या : land receipt

जमीन मालकाला दरवर्षी त्याच्या जमिनीचा कर हा महसूल स्वरूपात भरावा लागतो. हा महसूल भरल्यावर संबंधित तलाठी कार्यालयामधून पावती मिळते. ही पावती सांभाळून ठेवावी, कारण जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी या पावत्या एक पुरावा म्हणून वापरता येतात. 7 proof of Land record

6. जमीनीबाबत पुर्वीचे न्यायालयीन खटले

तुमच्या जमिनीसंदर्भात न्यायालयात जर आधी कोणतेही खटले सुरु आहे किंवा होते तर त्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे जपून ठेवावे. कारण कि, न्यायालयाचे हे कागदपत्र तुमच्या जमिनीवर तुमची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खूप कामी येऊ शकतात. हे न्यायालयीन कागदपत्रे जमि निच्या मूळ मालकाचे नाव आणि नोंद असलेला प्रत्येक कागद का खूपच महत्त्वाचा असतो. न्यायालयात पुरावा म्हणून वापरलेला अथवा संबंधित खटल्या दरम्यान सादर केलेला कोणताही कागदपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळेच तर जमिनी न्यायालयात खटल्या दरम्यान सादर केलेल कोणतेही कागदपत्र तुम्ही पुरावे जपून ठेवावे. पुढे जमिनीवर मालकी हक्क दाखविण्यासाठी हे पुरावे म्हणून खूप फायदेशीर ठरू शकतात. 7 proof of Land record

7. जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड : land property card

मालमत्ता पत्रकाला प्रॉपर्टी कार्ड देखील म्हटले जाते. शेतजमिनीच्या मालकीच्या नोंदी 7/12 उताऱ्यामध्ये नमूद केलेल्या असतात, त्याचप्रमाणे विना शेत-जमिनीवरील मालमत्तेची नोंदण आणि त्या जमिनीवरील मालकीचे अधिकार या सर्व बाबी मालमत्ता पत्रक म्हणजेच प्रॉपर्टी कार्डमध्ये नमूद केलेले असतात. प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेतजमिनीतील प्लॉट, त्यावरील बंगला, त्यावर बनवलेले ऑफिस, अपार्टमेंट मधील फ्लॅट या स्थावर मालमत्तेचे संपूर्ण मालकी हक्क, त्याचे मूल्य, शिर्षक, त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ, नोंदणी क्रमांक, कर्ज घेतल्याची संपूर्ण माहिती, संबंधीत जमिनीची भागीदारी कुणाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे का? ही संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच संबंधित जमिनीवरील तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्याकरिता प्रॉपर्टी कार्ड अत्यंत महत्त्वाचा असा दस्तावेज ठरतो. 7 proof of Land record

Leave a Comment