Traffic Challan पासून बचाव करण्यासाठी मोबाईलमध्ये Install करा हे App, कधीही होणार नाही दंड

आजच्या अत्याधुनिक काळात वाहन चालवताना वाटणारी सर्वात मोठी भीती म्हणजे Traffic Challan होय. रस्त्यावरील स्पीड कॅमेरे, पोलिस चेकिंग किंवा रोडब्लॉक्स यामुळे अनेकदा वाहनधारकांना दंड भरावा लागतो. पण आता घाबरायचे  नाही, कारण Google कडून आलेलं एक खास navigation app तुमचं हे काम सोपं करणार आहे.

आज आम्ही Google Maps बद्दल नव्हे तर, Google च्याच दुसऱ्या app बद्दल माहिती देणार आहोत, आणि त्या app चे नाव आहे Waze App. हे app तुमच्या ड्रायव्हिंगला करणार सुरक्षित आणि दंडमुक्त. हे app Android आणि iPhone दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

Waze App म्हणजे काय?

Waze हे Google ने अधिग्रहित केलेलं traffic navigation app आहे. यामध्ये यूजर्सना रस्त्यावरील real-time updates मिळतात. या ॲपमध्ये speed camera, police trap, roadblocks आणि इतर incidents बद्दल community-generated माहिती दिली जाते. म्हणजेच जर रस्त्यावर एखाद्या वाहनधारकाने trap पाहिला, तर लगेच इतर यूजर्सना त्यांच्या मोबाईलवर अलर्ट मिळतो, आणि ते सावध होतात.

Waze App वापरण्याचे फायदे

  • जेव्हा तुम्ही speed camera किंवा police checking point जवळ जाता, तेव्हा Waze तुम्हाला voice आणि visual alerts पाठवतं.
  • हे सर्व driving modes मध्ये चालतं, अगदी स्क्रीन बंद असली तरीही background मध्ये कार्यरत राहतं.
  • Waze app मध्ये फक्त तुमच्या मार्गावर असलेल्या घटनांचे updates मिळतात. त्यामुळे इतर फालतू माहिती दिसत नाही.
  • 0Google Maps मध्ये अशी सुविधा नसली तरी Waze App मध्ये default पद्धतीने उपलब्ध आहे.

Waze App चे खास फीचर्स

  • Live Traffic Updates: तुम्हाला कुठेही जायचं असेल, तर Waze तुम्हाला रस्त्यावरील सध्याची परिस्थिती सांगतं. यामुळे तुम्हाला माहित होतं की कुठे ट्रॅफिक जास्त आहे आणि कोणत्या मार्गाने गेलं तर तुमचा वेळ वाचेल.
  • Real-time Alerts: रस्त्यांवर काम चालू असेल, अपघात झाला असेल, किंवा कुठे पोलिस तपासणी सुरू असेल तर Waze तुम्हाला लगेच अलर्ट देतं. त्यामुळे तुम्ही आधीच सावध होऊ शकता.
  • Safe Driving: स्पीड कॅमेरे, रस्त्यावरील खड्डे किंवा इतर धोक्यांबद्दल Waze तुम्हाला आधीच सूचित करतं. त्यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित होतो.
  • Accurate ETA: तुमच्या प्रवासाला किती वेळ लागेल याचा अंदाज Waze अगदी अचूक देतं. यामुळे तुम्ही तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करू शकता.
  • Help From Other Drivers: Waze लाखो ड्रायव्हर्सच्या मोबाईल ने दिलेल्या माहितीवर चालतं. त्यामुळे तुम्हाला स्थानिक लोकांच्या ज्ञानाचा फायदा मिळतो आणि तुम्ही योग्य मार्ग निवडू शकता.

Waze App कसे वापरायचं?

  • तुमच्या मोबाईल मधील Google Play Store (Android साठी) किंवा Apple App Store (iPhone साठी) ओपन करा.
  • “Waze” असं सर्च करून Waze App Install करा.
  • ॲप उघडा आणि तुमच्या तणाव मुक्त प्रवासाची मजा घ्या.

Waze App नुसतं Traffic Challan टाळण्यासाठीच नाही, तर सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी देखील उपयुक्त आहे. हे app तुम्हाला सतत सतर्क करत राहतं, ज्यामुळे अपघाताची शक्यता काही पटींनी कमी होते आणि तुमचा प्रवास सुखकर होतो.

Leave a Comment