हरवलेले अन् चोरी झालेले मोबाईल कुरियरने येतायत घरी; नेमका विषय काय? बघा एका क्लिकवर – Sanchar Saathi

Sanchar Saathi – मोबाईल हरवला की तो परत मिळेल अशी आशा अनेकदा राहत नाही. मात्र आता हे चित्र बदलत आहे. केंद्र सरकारच्या अनोख्या उपक्रमामुळे देशातील हजारो नागरिकांना त्यांचे वर्ष दोन वर्षांपूर्वी हरवलेले स्मार्टफोन पुन्हा कुरिअरद्वारे परत मिळत आहेत. आणि हे केवळ शक्य झाले आहे ते ‘संचार साथी’ या सरकारी पोर्टलमुळे, ज्यात ‘Central Equipment Identity Register (CEIR)’ नावाची एक विशेष प्रणाली आहे.

या पोर्टलच्या सहाय्याने नागरिक त्यांचा हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईलची तक्रार ऑनलाईन प्रकारे पोर्टलवर नोंदवू शकतात. Sanchar Saathi पोर्टलवर तक्रार दाखल करताच तत्काळ संबंधित मोबाईलचा IMEI नंबर ब्लॉक केला जातो. यामुळे तो मोबाईल कोणत्याही नेटवर्कवर चालूच करता येत नसल्यामुळे त्याची विक्री करणे किंवा त्या मोबाईलचा वापर करणे अशक्य होते. या शिवाय ही टेक्नॉलॉजी मोबाईल ट्रॅक करण्याकरितासुद्धा सक्षम आहे, ज्यामुळे देशातील पोलिसांना हरवलेले मोबाईल शोधण्यात मोठी मदत होते.

पोलिसांनी अशा पद्धतीने तब्बल १२०० हरवलेले स्मार्टफोन परत मिळवून त्यांच्या मालकांना ते कुरिअरद्वारे पाठवले सुद्धा आहेत. त्यातही विशेष म्हणजे हे स्मार्टफोन तब्बल दोन ते तीन वर्षांपूर्वी हरवले/चोरी गेले होते.

हरवलेला स्मार्टफोन रिपोर्ट करण्यासाठी काय कराल?

जर तुमचाही मोबाईल हरवला असेल, तर तुम्ही खालील पद्धतीने तक्रार दाखल करू शकता

  • गुगल क्रोमवर “Sanchar Saathi Portal” असे टाईप करून शोधा किंवा डायरेक्ट sancharsaathi.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  • ‘Citizen Centric Services’ विभागात ‘Block Your Lost/Stolen Mobile Handset’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Block lost/stolen mobile handset’ हे निवडा.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि हरवलेल्या फोनचा IMEI नंबर टाका.
  • विचारलेली आवश्यक माहिती भरून फॉर्म व्यवस्थित सबमिट करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा फोन शोधला गेला तर तो तुमच्यापर्यंत कुरिअरने पाठवण्यात येतो.

दरम्यान २०२५च्या CII वार्षिक बिझनेस समिटमध्ये दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की भारत येत्या पाच वर्षांत जगातील डेटा केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. भारताची ‘Digital First’ अर्थव्यवस्था ही दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या बदलांमुळे शक्य झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांचा तंत्रज्ञानावर विश्वास वाढत आहे आणि हरवलेले फोन परत मिळण्याची शक्यता आता अधिक व्यवहार्य झाली आहे. मोबाईल हरवला की पोलिस ठाण्याची पायपीट करण्यापेक्षा आता फक्त काही क्लिकमध्ये तो पुन्हा मिळवणे शक्य झाले आहे हेच या योजनेचे यश आहे.

Leave a Comment