रेशन कार्ड धारकांनो घरबसल्या Ration Card e-KYC कशी करायची, जाणून घ्या प्रोसेस – Ration Card e-KYC 2025

Ration Card e-KYC : रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. जर तुम्ही शिधापत्रिकेचा लाभ घेत असाल आणि अद्याप e-KYC केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने याची अंतिम मुदत 31 हा मार्च 2025 निश्चित केली आहे. जर या तारखेपर्यंत e-KYC पूर्ण केली नाही, तर तुमचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे.

रेशन कार्ड e-KYC अनिवार्य का?

ई-केवायसी अनिवार्य करण्यामागे सरकारचा उद्देश गरजू आणि पात्र लोकांनाच रेशनचा लाभ मिळावा, हा आहे. अनेक ठिकाणी अपात्र व्यक्ती शिधापत्रिकेचा गैरवापर करत होते. त्यामुळे सरकारने आता e-KYC सक्तीचे केले आहे, जेणेकरून फक्त वास्तविक लाभार्थ्यांनाच धान्य मिळेल. 

e-KYC ची अंतिम तारीख (Ration Card e-KYC Deadline)

सर्वात पहिले  अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 होती, पण आता ती वाढवून 31 मार्च 2025 करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. 

जर तुम्ही दिलेल्या वेळेत e-KYC पूर्ण केले नाही, तर तुमच्या रेशन कार्डवरील नाव काढून टाकले जाऊ शकते आणि तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर e-KYC करा आणि रेशन मिळण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नका.

घरबसल्या मोबाईलवर e-KYC करण्याची सोपी पद्धत

पूर्वी लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावे लागत होते, मात्र आता Mera E-KYC App द्वारे हे घरबसल्या करता येणार आहे. 

Ration Card e-KYC करण्यासाठी लागणारी अ‍ॅप्स:

तुम्हाला प्ले स्टोअरवरून खालील दोन अ‍ॅप्स डाउनलोड करावे लागतील:

1) Mera E-KYC Mobile App – डाउनलोड करा

2) Aadhaar Face RD Service App – डाउनलोड करा

Ration Card e-KYC करण्याची Step-by-Step प्रक्रिया:

  1. अ‍ॅप इन्स्टॉल करा: वरील दोन्ही अ‍ॅप्स डाउनलोड करून योग्य परवानग्या द्या. 
  2. Mera E-KYC अ‍ॅप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा:
    • राज्य निवडा: महाराष्ट्र
    • आधार क्रमांक टाका आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
    • कॅप्चर कोड प्रविष्ट करा.
  3. चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication):
    • समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.
    • स्क्रीनवरील सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.
    • दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.
  4. सत्यापन पूर्ण:
    • यशस्वी पडताळणी झाल्यास तुमची माहिती रेशन दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल.
    • खात्री करण्यासाठी अ‍ॅपमध्ये “E-KYC Status” तपासा.
    • जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

e-KYC संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे:

✅ ही सुविधा फक्त महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे. 
✅ महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांनी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा 
✅ e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे.
✅ रेशन दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून ही प्रक्रिया वेळीच पूर्ण करावी.

रेशन कार्ड e-KYC पूर्ण करा आणि पुढील समस्यांपासून बचाव करा!

जर तुम्ही अजूनही e-KYC केली नसेल, तर 31 मार्च 2025 पर्यंत ती पूर्ण करा. वेळेत केवायसी न केल्यास, रेशन बंद होईल आणि शिधापत्रिकेवरून नाव काढले जाऊ शकते

तातडीने कृती करा आणि तुमच्या कुटुंबाचा रेशन मिळण्याचा हक्क वाचवा!