PAN Number Loan Check : आजकाल पॅनकार्डशी संबंधित घोटाळे (PAN Card) वाढू लागले आहेत. घोटाळेबाज लोकांच्या कागदपत्रांचा उपयोग करून त्याचा गैरफायदा घेत आहेत. जर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की तुमच्या पॅनकार्डचा कुणी दुरुपयोग करत आहे किंवा या माध्यमातून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहे तर याचा सहजपणे शोध घेता येऊ शकतो.
चला तर मग काय आहे प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ या.
आज पॅनकार्डएक आवश्यक कागदपत्र बनले आहे. पॅनकार्ड नसेल तर पैशांशी संबंधित कोणतेही काम तुम्ही करू शकत नाहीत. पॅनकार्ड पगार आणि पेन्शन संबंधित कामांसाठी सुद्धा वापरात येते. यामध्ये आयटी फाईल करणे, एखाद्या योजनेसाठी अर्ज करताना, पेन्शनसाठी तसेच कर्ज घेण्यासाठी पॅनकार्डचा उपयोग होतो. आज आधारकार्ड जितके (Aadhar Card) महत्वाचे आहे तितकेच पॅनकार्ड सुद्धा आहे. त्यामुळे पॅनकार्ड सुरक्षित असणे खूप गरजेचे आहे. PAN Number Loan Check
जर कुणी एखादा व्यक्ती तुमच्या पॅनकार्डचा उपयोग कर्ज घेण्यासाठी करत आहे असा जर तुम्हाला संशय असेल तर या गोष्टीचा शोध सहज घेता येऊ शकतो. या गोष्टीचा शोध घेणे महत्त्वाचे आहे कारण भविष्यात तुम्हाला या कर्जाची परतफेड करावी लागू शकते.
शोध कसा घ्याल (PAN Number Loan Check)
यासाठी तुम्हाला आधी सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर जारी (CIBIL Score) करणाऱ्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर खाली दिलेल्या पर्यायांचा अवलंब करा.
- स्टेप 1 : सर्वात आधी सिबिल वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला Get your Cibil Score हा पर्याय दिसेल.
- स्टेप 2 : यावर क्लिक केल्यानंतर सबस्क्रिप्शनचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप 3 : जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईटचा उपयोग करत असाल तर तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- स्टेप 4 : रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमची जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई मेल आयडी यासारखी माहिती भरावी लागेल. नंतर लॉग इन credentials तयार करा. यानंतर लॉग इन करावे लागेल.
- स्टेप 5 : यानंतर पॅन नंबर टाकून Check Cibil Score वर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी तेथे टाका.
- स्टेप 6 : यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर स्क्रीनवर दिसेल. तसेच लोन सेक्शनवर जाऊन तुमच्या नावावर किती लोन आहे याची माहिती तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या पॅन कार्डवर काही चुकीची माहिती नोंद झालेली असेल तर ती माहिती बदलताही येऊ शकते.
माहिती कशी अपडेट कराल
यासाठी आधी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवर (Income tax Department) जावे लागेल. यानंतर पॅनकार्ड नंबर आणि आवश्यक माहिती भरून लॉग इन करा. यानंतर तुम्हाला पॅनकार्ड करेक्शनचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पॅनकार्ड नंबर आणि मागितलेली अन्य माहिती आणि कागदपत्रांची माहिती भरा.
यानंतर तुम्हाला शुल्कापोटी काही रक्कम भरावी लागेल. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट करून ट्रॅक नंबर नोंद करू ठेवा. या नंबरच्या माध्यमातून पॅनकार्डमधील बदलाची माहिती तुम्ही घेऊ शकता.