महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; जाणून घ्या Mofat Pithachi Girani Yojana बद्दल

Free Flour Mill Scheme for Women :महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे – Mofat Pithachi Girani Yojana 2025 (Free Flour Mill Scheme for Women) या योजनेतून महिलांना मोफत पीठ गिरणी उपलब्ध करून देण्यात येते, ज्यातून त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आत्मनिर्भर बनू शकतात.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना लघु उद्योगासाठी मदत करणे. विशेषतः अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी ही योजना उपयुक्त आहे.

Mofat Pithachi Girani Yojana 2025 अंतर्गत ९०% अनुदान सरकारकडून दिले जाते आणि लाभार्थी महिलेला फक्त १०% रक्कम भरावी लागते.

Mofat Pithachi Girani Yojana ची वैशिष्ट्ये:

  • महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
  • रोजगारनिर्मिती
  • सामाजिक समतेला बळकटी
  • कौटुंबिक उत्पन्नात वाढ

पात्रता निकष

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
  • वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे
  • अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असणे आवश्यक
  • वार्षिक उत्पन्न १.२० लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • बँक खाते असणे गरजेचे

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • फोटो
  • BPL कार्ड (असल्यास)
  • शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन

अर्ज प्रक्रिया:

  • स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात जाऊन अर्ज भरावा
  • सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
  • पात्रता तपासल्यानंतर अनुदान मंजूर होईल
  • अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल

व्यवसायाचे फायदे:

  • वर्षभर चालणारा व्यवसाय
  • कमी गुंतवणुकीत चांगला नफा
  • विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही
  • स्थानिक गरज असल्यामुळे स्थिर उत्पन्न

Mofat Pithachi Girani Yojana 2024: Free Flour Mill Scheme for Women मुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरता मिळवली आहे. हिंगोली जिल्ह्यात या योजनेतून १०६ महिलांना गिरण्या वाटप करण्यात आल्या आहेत.