Get Owner Details From Vehicle Number: गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे

Get Owner Details From Vehicle Number : कोणत्याही गाडीच्या फक्त नंबरवरुन त्याच्या मालकाचे नाव माहित करुन घेणे आजच्या डिजिटल काळात फार सोपे झाले आहे. गाडीच्या नंबरवरुन तुम्हाला त्या संबंधीत सर्व माहिती घरबसल्या मोबाईलवर फक्त एका क्लिकवर मिळते.

तुम्ही देखील पाहिले असेल कि गाडीचा अपघात झाल्यानंतर लोक पळून जातात. अशा वेळेस जर तुम्हाला ज्याच्यामुळे अपघात झाला आहे त्याच्या गाडीचा नंबर माहित असेल तर तुम्ही त्याला पकडू शकता.

याशिवाय गाडीचा नंबर माहित असण्याचा सर्वात मोठा फायदा तेव्हा देखील होतो जेव्हा तुम्ही सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करायला जाता. तुम्हाला जी गाडी आवडली आहे ती पूर्वी कुणाची होती, केव्हा घेतली होती तसेच गाडीला किती वर्षे झाले आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला माहित करुन घेणे सोपे जाते. विविध परिस्थितीत तुम्ही हि ट्रिक वापरुन स्वतःची तसेच इतर गरजू व्यक्तीची देखील मदत करु शकता.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला फक्त गाडीच्या नंबरवरुन त्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता कसा जाणून घ्यायचा आहे हे सांगणार आहे. यासाठी तुमच्या जवळ फक्त एक फोन आणि इंटरनेट असणे गरजेचे आहे.

Get Owner Details From Vehicle Number

  • तुम्हाला अगोदर या लिंक वर क्लिक करून प्ले स्टोअर वर जाऊन mParivahan हे अँप डाउनलोड करा.
  • अँप Install केल्यावर ओपन करा.
  • यानंतर समोरील डॅशबोर्डवर RC या Option वर क्लिक करुन गाडीचा नंबर टाका.
  • तुम्हाला ज्या गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता माहित करुन घ्यायचा आहे त्या गाडीचा नंबर येथे टाकायचा आहे.
  • गाडी नंबर टाकल्यानंतर सर्च बार वर क्लिक करा. तुम्हाला त्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता हि सर्व माहिती समोर दिसेल.

मॅसेजचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अँप install न करता एखाद्या गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव माहित करुन घ्यायचे असेल तर तुम्ही मेसेजचा वापर करूनही तुम्ही गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाचे नाव जाणून घेऊ शकता, शिवाय हि सुविधा तुम्ही २४ तास वापरु शकता.

  • सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमधील मेसेजिंग अँप ओपन करा.
  • त्यानंतर मेसेज बॉक्समध्ये कॅपिटल लेटरमध्ये VAHAN असे टाईप करा.
    मग स्पेस देऊन गाडीचा नंबर टाका.
  • आता हा मेसेज 7738299899 या नंबर वर पाठवा. (उदा: VAHAN <space> गाडीचा नंबर)
  • मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ID Vahan कडून एक मेसेज येईल.
  • ज्यामध्ये गाडी नंबर असलेल्या मालकाचे नाव आणि पत्ता तुम्हाला पहायला मिळेल.

वेबसाईटचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

वेबसाईटचा वापर करुन तुम्ही केवळ २ मिनिटात गाडीच्या मालका विषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता.

  • वेबसाईटच्या माध्यमातून मालकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर vahaninfos.com वर जावं लागेल.
  • तेथे खाली गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा नंबर टाकून कॅपचा भरावा लागेल.
    कॅपचा भरुन झाल्यावर Submit बटनावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला गाडीच्या नंबर वरुन सगळी माहिती मिळेल.
  • जसे कि ती गाडी कुणाच्या नावावर रजिस्टर आहे. गाडी केव्हा घेतली गेली होती या प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.