शेतकऱ्यांकडे कर्जासाठी CIBIL मागू नका, अन्यथा गुन्हा दाखल करणार; मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिली सक्त ताकीद – Farmer Cibil Score

Farmer Cibil Score Loan: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Agriculture Loan) खासगी बॅंकांना शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावरून (Agriculture Loan) चांगलंच खडसावलं आहे.

शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोर पाहू नका (Credit Score For Farm Loan), असं आम्ही वारंवार सांगितलं आहे. गुन्हे देखील दाखल केले आहेत. तरीही तुम्ही ऐकत नाही, यावर तोडगा काय काढणार ते तुम्हीच सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी बॅंकांना (Farmer Cibil Score Loan) फटकारलं आहे.

राज्यस्तरीय बॅंकर समितीची बैठक पार पडल्यानंतर ICICI, HDFC, Axis बॅंकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्‍यांनी चांगलंच फैलावर घेतलं. कोणती बॅंक शाखा सिबील मागत असेल, तर त्या बॅंकेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मला तुमच्याकडून (Farmers Low CIBIL Loan) आजच हवाय, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. रिझर्व्ह बॅंकेने सुद्धा असेच आदेश दिले आहेत, तर उल्लंघन करणाऱ्या बँकांवर सरकारने गुन्हा दाखल केलाय, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

Farmer Cibil Score Loan

बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करावे, असं देखील मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे. यावेळी दुष्काळी परिस्थिती नसल्यामुळं पीक चांगलं येणार आहे. बॅंकानी अशात शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायलं हवं. महाराष्ट्रात FPO मोठ्या संख्येने असून MSMEs सुद्धा सर्वाधिक आहे. राज्यात गुंतवणुकीचा मोठा ओघ असून दावोसमधून 16 लाख कोटींची गुंतवणकूक महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्र आता स्टार्टअपची राजधानी असल्यामुळे लक्ष दिल्यास मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

राज्य सरकारने याआधीही बॅंकांना सूचना दिल्या होत्या. शेतकऱ्यांना कृषी कर्ज देताना बँका आणि फायनान्स कंपन्या सिबिल स्कोअरची अट घालतात. त्यामुळे शेतकरी दुसरा पर्याय निवडतो अन् खासगी सावकाराकडे जाऊन बळी पडतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेंने स्पष्ट केलं होतं की, शेतकऱ्यांसाठी सिबीलची अट नाही. शेतकऱ्यांना कर्ज देताना ही अट काढून टाका, असे राज्य सरकारने याआधी देखील निर्देश दिले होते.

Leave a Comment