शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार सोलर फवारणी पंप; जाणून घ्या Solar Spray Pump योजनेबद्दल

Solar Spray Pump : आजच्या काळात शेतीमध्ये पर्यावरणपूरक आणि खर्चविरहित तंत्रज्ञानाची नितांत गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपांसाठी विशेष योजना सुरू केली असून, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. ही योजना शेतीतील इंधन खर्च कमी करून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत करत आहे.

Solar Spray Pump चे फायदे

  • फक्त एकदाच गुंतवणूक करून अनेक वर्षे मोफत ऊर्जा
  • डिझेल किंवा वीजेवरील खर्च पूर्णतः वाचतो
  • देखभाल खर्च कमी आणि आयुष्य जास्त
  • दुर्गम भागात वापरण्यास सुलभ
  • कार्बन उत्सर्जन शून्य असल्यामुळे पर्यावरणपूरक

सौर फवारणी पंप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून Solar Spray Pump योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत खालील प्रमाणात अनुदान दिले जाते:

  • अनुसूचित जाती / जमाती, महिला शेतकरी, लघु आणि सीमांत शेतकरी – 90% ते 100% पर्यंत अनुदान
  • इतर सर्वसामान्य शेतकरी – 70% पर्यंत अनुदान

मोबाईलवरून अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

  • मोबाईलमधील Google Chrome किंवा तुम्ही जे वापरत असाल ते ब्राउझर ओपन करा.
  • mahadbt farmer login असे सर्च करा आणि AgriLogin – Maha DBT https://www.mahadbt.maharashtra.gov.in लिंकवर क्लिक करा.
  • वेबसाइट स्क्रोल करून सूचना वाचून ‘OK’ करा.
  • तुमचा Farmer ID टाका. माहित नसल्यास आधार क्रमांक टाकून OTP द्वारे तो मिळवता येतो.
  • OTP टाकून लॉगिन करा.
  • लॉगिननंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • कृषी यांत्रिकीकरण > कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य > मनुष्यचलित औजारे > पिक संरक्षण औजारे > सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप निवडा.
  • सर्व पर्याय भरून ‘जतन करा’, नंतर ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.
  • नंतर अर्ज फी ₹23.60 ऑनलाईन पेमेंट करा (QR कोड वापरणे सोपे).
  • अर्जाची पावती प्रिंट किंवा PDF मध्ये सेव्ह करून ठेवा.

आवश्यक कागदपत्रांची यादी

  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा (७/१२)
  • बँक पासबुक आणि IFSC कोड
  • शेतकऱ्याचा फोटो
  • सामूहिक शेती असल्यास गटाची माहिती आणि सहमतीपत्र

कोणासाठी ही योजना फायदेशीर

  • दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी
  • वीजेची उपलब्धता कमी असलेले गाव
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकरी
  • महिला शेतकरी, अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थी

Leave a Comment