HSRP Number Plate Registration Online Process: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP Number Plate लावणे बंधनकारक केले असून यासाठी प्रोसेस सुरु आहे. आतापर्यंत लाखो वाहनांना HSRP Number Plate बसवण्यात आली असून अद्यापही बऱ्याच वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी मुदतीपूर्वी बसवून घ्यावी, अन्यथा तुम्हाला 10 हजारांचा दंड बसेल.
HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Number Plate Online Registration Process)
- सर्वप्रथम तुम्हाला https://bookmyhsrp.com/ या वेबसाइटवर जायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वाहनाचा प्रकार म्हणजे (टू व्हिलर की फोर व्हिलर) हे निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती भरायची आहे. यात आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती असणार आहे. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेली असणार आहे.
- यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे त्याचा पत्ता भरा त्यानंतर वेळ आणि तारीख निवडा.
- यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. ३०० ते ६०० रुपयांपर्यंत हा चार्ज असणार आहे.
- यानंतर तुम्हाला हाय सिक्युरीटी नंबर प्लेटची रिसिप्ट मिळेल. त्याचे पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवा. हे जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा दाखवावे लागेल.
कोणत्या वाहनांसाठी किती खर्च?
दुचाकी (ट्रॅक्टर, बाईक, स्कूटर) : 531 रुपये
तीनचाकी (ऑटो-रिक्षा) : 590 रुपये
चार चाकी ( कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो, ट्रेलर इत्यादी) : 879 रुपये