स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी Location Tracking ही एक उपयुक्त सेवा आहे. Google Play Store वर अनेक Location Tracker Apps उपलब्ध आहेत. मात्र, यातील बऱ्याचशा अॅप्सना वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात. ही सेवा काही ठिकाणी ₹1000 ते ₹3000 पर्यंत शुल्क आकारते. काही अॅप्स तर लोकेशन शेअर करण्याआधीच पैसे मागतात आणि नंतर मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन सक्तीचा केला जातो.
पण जर तुम्हाला ही सेवा एकही रुपये न देता हवी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपी आणि फ्री मेथड घेऊन आलो आहोत — ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे लोकेशन त्यांच्या परवानगीने ट्रॅक करू शकता.
Mobile Number live Location Track करणाऱ्या Apps पासून सावध रहा!
Play Store वर तुम्हाला बऱ्याचशा Live Location Tracker by Mobile Number अॅप्स सापडतील. पण यातील बहुतांश अॅप्स पेड सर्व्हिस देतात. त्यामुळं एकदा अॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला पैसे भरावे लागतात. मात्र जर तुम्हाला फ्रीमध्ये लोकेशन ट्रॅक करायचे असेल, तर ही पद्धत वापरा:
Google Maps वापरून फ्रीमध्ये लोकेशन कसे ट्रॅक करावे?
- ज्याचे लोकेशन ट्रॅक करायचे आहे त्याच्या फोनमधील Google Maps App उघडा.
- वरच्या कोपऱ्यात असलेल्या Profile Icon वर टॅप करा.
- Location Sharing हा पर्याय निवडा.
- तिथे “Share Location” या पर्यायावर टॅप करून तुमचा Mobile Number किंवा Gmail ID अॅड करा.
यानंतर, ती व्यक्ती जिथे जाईल तिथे तिचे लाईव्ह लोकेशन तुमच्या Google Maps वर सतत दिसत राहील.
Location Tracker App चे फायदे
- फोन हरवल्यास उपयोगी:
- जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीस गेला, तर तुम्ही आधीपासून तुमचे लोकेशन Google Maps वर कुणासोबत शेअर केले असेल, तर त्या व्यक्तीच्या मोबाईलवरून तुमचा फोन कुठे आहे ते समजते.
- ओळखीच्या व्यक्तीचं लोकेशन ट्रॅक करा:
- कधी कधी एखादी व्यक्ती कुठे आहे याबद्दल चुकीची माहिती देत असते. अशा वेळी, जर त्या व्यक्तीने तुमच्यासोबत Location Share केले असेल, तर तिचं खोटं सहज उघड होऊ शकतं.
- पालकांसाठी उपयोगी:
- सध्याच्या काळात तरुण मुले रात्री उशिरा बाहेर फिरायला जातात. अशा वेळी Parents ना काळजी वाटते. जर मुलांच्या मोबाईलमधून Google Maps Location Sharing चालू असेल, तर पालक आपल्या मुलांचं लोकेशन पाहू शकतात आणि निश्चिंत राहू शकतात.
निष्कर्ष:
मोबाईल नंबरद्वारे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी महाग अॅप्स वापरण्याऐवजी, Google Maps Location Sharing ही अगदी फ्री आणि सोपी पद्धत आहे. यामध्ये कोणताही खर्च नाही आणि माहितीही अचूक मिळते. फक्त संबंधित व्यक्तीची परवानगी आवश्यक आहे.