Online सातबारा (7/12) कसा बघायचा?

online satbara

⬤ सर्वात आधी तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल.

⬤ त्याच्या पुढे तुम्हाला तुमचा स्वतःचा विभाग निवडावा लागेल.

⬤ आता या नंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव तुम्हाला निवडावं लागेल.

⬤ यानंतर सर्वे नंबर / गट नंबर अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर/ पहिले नाव/ मधील नाव/ आडनाव किंवा संपूर्ण नाव या सगळ्यापैकी कोणतीही एक माहिती भरावी लागते.

⬤ त्यासोबतच मोबाइल नंबर देखील भरावा लागेल.

⬤ त्या नंतर शोधा या बटनावर क्लिक करावे.

⬤ त्या नंतर आपल्याला लिस्ट मधून ज्याचा पण 7/12 तुम्हाला पाहायचा असेल, त्या व्यक्तीचे नाव सिलेक्ट करावे.

⬤ या नंतर आपल्या समोर एक नवीन विंडो मध्ये आपला online सातबारा(7/12) उतारा पाहायला भेटेल.