kadba kutti subsidy scheme in marathi

☞ कडबा कुट्टी अनुदानाच्या अटी व शर्ती:

⬤ या योजनेचा लाभ घेवू इच्छित असणारा लाभार्थी हा ग्रामीण भागातीलच रहिवासी असावा.
⬤ त्याचबरोबर तो शेतकरी असणे गरजेचे आणि सक्तीचे आहे.
⬤ त्याचबरोबर ज्यांच्या नावावर अर्ज करायचा आहे, त्या शेतकऱ्याच्या नावावर दहा एकरपेक्षा जास्त जमीन नसावी.
⬤ या शेतकऱ्याचे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये त्याचा नावाच्या बचत खात्याशी आधार कार्ड जोडलेले देखील असावे.

कडबा कुट्टी मशीन योजना 2023 महाराष्ट्र

☞ कोणाला फायदा होऊ शकतो :

हे 2023 योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन मिळविण्यासाठीचे अनुदान महाडबीटी शेतकरी योजनेनुसार राज्यातील शेतकरी अर्ज करू शकतात.सरकार 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. त्याच मोहिमेचा एक भाग ही योजना आहे,शेतकऱ्यांना त्यांच्या श्रेणीवर या योजनेअंतर्गत नवीन कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्यावर सुमारे 50% पासून 75% पर्यंत अनुदान दिले जाते. आणि या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की शेतकरी त्यांच्या पसंतीची कोणत्याही कंपनीची कडबा कुट्टी मशीन खरेदी करू शकतात. आणि ते पण मशनीच्या अर्ध्या किमती मध्ये….

☞ त्याकरिता लागणारी विविध आवश्यक कागदपत्रे.

⬤ बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
⬤ सतरा उतारा.
⬤ 8 एक उतारा.
⬤ घराचे वीज बिलची झेरॉक्स प्रत.
⬤ आधार कार्डची झेरॉक्स प्रत.

➭ कडबा कुट्टी अनुदान या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करण्याचा हे जाणून घेवू……

☞ योजनेसाठी अर्जा करण्याच्या पद्धती:

कडबा कुट्टी अनुदान योजना या योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी शेतकऱ्याला त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागेल. त्याच बरोबर या योजनेचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ऑफलाइन देखील भरता येतील.

➤ जिल्हा परिषद/पंचायत समिती-

कडबा कुट्टी मशिनसाठी राष्ट्रीय पशुधन विकास योजनेंतर्गत साधारणपणे 75% अनुदान पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत दिले जाते परंतु या अंतर्गत निवडलेल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे.

MahaDBT

➤ mahadbt पोर्टल –

कडबा कुट्टीसाठी अनुदान मिळविण्यासाठी शेतकरी या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत mahadbt पोर्टलवर अर्ज करू शकतात.

☞ mahadbt पोर्टलवर अर्ज कसा करायचा:

⬤ आधी mahadbt वेबवर जा.
⬤ तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
⬤ तुमची जमीन नोंदणी तर इथे टच करा.
⬤ लॉगीन अर्ज करा अशी लिंक केल्यावर तिथे क्लिक करा.
⬤ कृषी वाढीकरण या पर्यायावर क्लिक करा.
⬤ जसे की हि तुम्ही कृषी उत्पादन या पर्यायावर क्लिक कराल तेव्हा एक अर्ज करा.
⬤ तुमच्या कॉम्प्युटरवर खालीलप्रमाणे माहिती निवडणे आवश्यक आहे.
⬤ अर्थसहाय्य हा पर्याय मुख्य घटक कृषी यंत्रमाग खरेदीसाठी निवडा.
⬤ तेथील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडावा.
⬤ एचपी श्रेणी आणि व्हील ड्राईव्ह प्रकारमध्ये काही पर्याय निवडणे नाही.
⬤ यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास आणि स्ट्रा हा पर्याय निवडा.
⬤ श्रेणीमध्ये खर्च श्रेणी रिकामी सोडावी.
⬤ मग सर्वात शेवटी मशीन वरील प्रकार 3 पर्यंत 3 असे पर्याय इतर पर्याय एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा .