तर या महिलांना मिळणार मोबाईल;

सरकार आता अंगणवाडी सेविका करणाऱ्या महिलांना स्मार्टफोन देणार आहेत. कुपोषित मुले, लहान मुलांचा आहार, गरोदर महिलांविषयी माहिती या सगळ्यासाठी नोंद करण्यासाठी सरकार आता त्यांना स्मार्टफोन देणार आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असून यासाठी पुढे पावले उचलण्यास सुरुवात देखील झाली आहे.

यापूर्वी देखील सरकारने अंगणवाडी सेविका यांना मोबाईल दिलेले होते परंतु ते मोबाईल चांगल्या पद्धतीने काम करत नाही अंगणवाडी सेविकांनी ते सर्व मोबाईल परत केले होते. अंगणवाडी सेविकांना आता पुन्हा नवीन मोबाईल देण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.