sheli palan loan online apply

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत;

मित्रांनो आता शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे तर कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज कशाप्रकारे सादर करावा तेही ऑनलाइन पद्धतीने याविषयी माहिती घेऊया. यासाठी पुढील दिलेल्या महत्त्वाच्या पद्धतींचा एका मागोमात एक अवलंब करावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता तुम्ही पैसा बाजार डॉट कॉम वरून अर्ज सादर करू शकता.

१) सर्वात प्रथम google वर जाऊन पैसा बाजार डॉट कॉम ची अधिकृत वेबसाईट ओपन करा.

२) त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे व नमूद केल्याप्रमाणे कर्जाची रक्कम आणि विक्रीचा अहवाल इत्यादी माहिती सुद्धा भरायचे आहे.

३) त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर शहर व इतर माहिती विचारली जाईल ती भरून पुढे जा या बटणावर क्लिक करावे.

४) तिथून पुढे तुम्हाला तुमच्या सिबील स्कोर किती आहे ते सांगितले जाईल आणि त्यानुसार तुमची पात्रता निश्चित केली जाईल.

५) त्यानंतर पुढे तुमची वैयक्तिक माहिती तिथे टाकावी लागेल.

६) तुमचे मासिक किंवा वार्षिक उत्पन्न कोणत्या खात्यामध्ये येते ते खाते त्या ठिकाणी निवडावे.

७) त्यानंतर पुढे मित्रांनो तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा व जन्मतारीख पिन कोड देखील टाकावा.

८) पुढे तुमच्या ईएमआय कंपनीचे नाव व तुमचा अनुभव त्या ठिकाणी भरावा.

९) पुढे तुम्हाला बँक ऑफर या सोबतच फायनान्स कंपनी ऑफर उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.

१०) पुढे तुम्हाला तुमच्या बँकेच्या माध्यमातून जे कर्ज मिळाले आहे त्या व्याजदर लावावा व कालावधी निश्चित करून एम आय या सोबतच इतर प्रक्रिया शुल्क भरून अर्ज सबमिट करावे.

११) अर्ज सबमिट करणे आधी तुमच्या शहराचे नाव पिन कोड टाकून चेक बटन यावर क्लिक करावे.

१२) शेवटी जर वैयक्तिक माहिती काही राहिले असेल तर ती व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करावा.

१३) अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच तुम्ही जे बँक निवडले आहे त्या बँकेतून कॉल येईल ज्या ठिकाणी तुमच्या कडून काही महत्त्वाची माहिती विचारण्यात येईल आणि तुमची माहिती सत्यपीत आहे की नाही केली जाईल.

१४) तुमची माहिती सत्यपीत झाल्यानंतर तुम्हाला कर्ज मंजुरीसाठी पात्र ठरवले जाईल आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची जी काही रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल.